मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत क्रांतिवीर शाळेची हॅट्रिक.

ताज्या बातम्या:
मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत क्रांतिवीर शाळेची हॅट्रिक.मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत क्रांतिवीर शाळेची हॅट्रिक.


म्हसवड…प्रतिनिधि
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन मध्ये क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवडने माण तालुक्यात खाजगी शाळा प्रवर्गातून सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रीक साधली आहे.
शालेय दर्जा सर्वांगीण दृष्ट्या सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवीत आहे.
शाळेमधील सलग गुणवत्ता, शैक्षणिक साधनसामुग्री, क्रीडांगण व भौतिक सुविधा , परसबाग, स्वच्छता, इको क्लब, साक्षरता, मतदार जनजागृती व संलग्न उपक्रम, क्षेत्रीय भेटी, कौशल्य युक्त शिक्षण, संगणक प्रयोगशाळा, अध्ययन निष्पत्ती निपुण महाराष्ट्र, आरोग्य सेवा, विद्यार्थी सुरक्षा तसेच विद्यार्थी लाभार्थी या व इतर योजनांची अंमलबजावणी बाबत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व तज्ञ मान्यवरांच्या कमिटीने नुकतीच शाळेत भेट दिली व पडताळणी करून गुणांकन केले. गतवर्षी या स्पर्धेत क्रांतिवीर शाळेने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावून सात लाखाचे बक्षीस मिळवले होते. यावर्षी आम्ही जिल्ह्यात प्रथम क्रमांकासाठी स्पर्धेत असल्याचे मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी सांगितले. शाळेच्या यशाबद्दल शिक्षक पालक यांनी शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *