उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनामुळे म्हसवड परिसरात शोककळा, व्यापारी पेढ्या बंद ठेवून श्रद्धांजली

म्हसवड (वार्ताहर)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर म्हसवड शहरात शोककळा पसरली होती.
म्हसवड शहरातील व्यापार पेठ बंद ठेवून म्हसवडच्या नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात नुकतेच बारामती येथे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखे म्हसवड शहरांमध्ये पसरली म्हसवड शहरातील विविध व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
म्हसवड शहरातील व्यापाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या वेळेला दुःख व्यक्त केलेले आहे
म्हसवड येथील श्रीमंत जयराज राजमाने यांनी शहरातील नागरिकांना बंदचे आवाहन करताच म्हसवड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने बंद ठेवून अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली तर म्हसवडचे नगरसेवक युवराज सूर्यवंशी व नगरसेविका सौ.स्नेहल सूर्यवंशी यांनी म्हसवड नगरपालिका सभागृहाच्या समोर श्रद्धांजली सभेचे आयोजन केलेलं होते .
या सभेला नगरसेवक, नगराध्यक्षा पूजा वीरकर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी म्हसवड शहरात ठीक ठिकाणी श्रद्धांजलीचे फलक लावून अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
अनेकांनी यावेळेला दुःख व्यक्त केलेले आहे.
अजित दादा पवार यांच्या निधनान राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी हानी झालेली आहे असे विचार श्रीमंत अजितराव राजेमाने यांनी व्यक्त केले.
म्हसवड शहरातील नागरिकांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *