म्हसवड…प्रतिनिधी
राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, संवर्धन तसेच संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड यांचा सातारा जिल्हा सामाजिक वनीकरण विभाग यांच्या तर्फे सन्मान करण्यात आला.
भारत देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभाग सातारा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी रेश्मा होरकाटे , सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी हर्षाराणी जगताप , वनक्षेत्रपाल अर्जुन गंभरे, दहिवडी वनक्षेत्रपाल अशोक खाडे, वनरक्षक विश्वास मिसाळ , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचा सन्मान प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर , उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर उपस्थित होते.
राष्ट्रीय हरित सेना व इको क्लब अंतर्गत
वृक्षारोपण व संवर्धन, जलसंवर्धन , पर्यावरण पूरक शेती, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत, प्लास्टिक मुक्त परिसर तसेच या संलग्न विविध कार्यक्रम राबवून शाळेने सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल शाळेचा वनीकरण विभागातर्फे सन्मान करण्यात आला. यापूर्वीही राज्यस्तरावर शाळेचा वनश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. हा सन्मान क्रांतिवीर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांचा एकत्रित असल्याचे मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!