क्रांतिवीर संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.


म्हसवड… प्रतिनिधी
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे भारत देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांचे आकर्षक संचलन, रंगीबेरंगी स्वरूपातील कवायती , घोषणा याचबरोबर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल अंतर्गत क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवडच्या प्रांगणात म्हसवड वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड. सुदर्शन माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर, संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक विश्वास मिसाळ, प्राचार्य विठ्ठल लवटे मुख्याध्यापक अनिल माने व पूनम जाधव इत्यादी मानेवर उपस्थित होते.
क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड येथील ध्वजारोहण संस्था उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य विन्सेंट जॉन, शिक्षक, पालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड. सुदर्शन माने म्हणाले क्रांतिवीर शाळा एक उपक्रमशील शाळा असून शाळेने आपला गुणात्मक दर्जा अनेक वेळा दाखवून दिलेला आहे. जिल्हा व राज्यस्तरावर शाळेने नावलौकिक मिळविला आहे. सामान्य विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांची सर्वांगीण प्रगती केल्यामुळे शाळेचे नाव उज्वल झाले आहे. स्वच्छ, सुंदर व दर्जेदार व्यवस्थापन शाळेने जोपासल्याबद्दल सुदर्शन माने यांनी विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर तसेच सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. शाळेला उज्वल भवितव्य असल्याचे सांगून ग्रंथालयासाठी माने यांनी दहा हजार रुपये ची पुस्तक भेट दिली.
या निमित्ताने ॲड. इंद्रजीत बाबर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रज्वल गोरड या चिमुकल्याने केलेली भाषण कार्यक्रमात आकर्षक ठरले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते, दहिवडी सामाजिक वनीकरण विभाग आयोजित चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वाटप , विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक रोहिणी काटकर यांनी तर सूत्रसंचालन मेघा मोरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *