सांगोला प्रतिनिधी
दुष्काळाच्या सावटाखाली सर्वत्र राज्य होरपळत असताना, आपल्याकडे जे आहे ते राखून ठेवणे गरजेचे व ज्यांची दिवाळी दुःखाची त्यांचे आनंदाची होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्वांची दिवाळी आनंदाची करायची व यासाठी आजचा दिवाळी आनंद मेळावा आहे व शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मान सोहळा साजरा करीत आहोत असे आनंद लॉन्स सांगोला येथे शेतकरी मेळाव्यात प्रा. राम मुखेकर सर यांनी उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त केले.
सुरुवातीस शेतकऱ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी शेती करताना मन अस्थिर ठेवू नये मन स्थिर पाहिजे व तीस वर्षांपूर्वी शेती सोपी व सुपीक होती आज नापीक व अवघड का होत आहे कारण केमिकल्स, रासायनिक खतामुळे शेती नापीक होत आहे व तीस वर्षांपूर्वी शेतकरी अन्नदाता होता आता राहिला नाही व यासाठी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकची साथ घ्या व दुष्काळावर मात करून शेती करा कारण शेतकरी हा शेताचा राजा आहे व यासाठी घेऊनि SCT वैदिक ची साथ करू दुष्काळावरती मात याचा अवलंब करा असेही राम सर यांनी सांगितले. तसेच जनावरासाठी फॅट चांगली व दूध चांगली मिळण्यासाठी मिल्क चार्जरचा शेतकऱ्यांनी वापर करावा व यामुळे जनावराच्या आरोग्य सुधारते व शेतकऱ्यांना वाईट दिवस येऊ नयेत म्हणून हा आनंदी मेळावा आहे असेही सांगितले. यावेळी राम सर हे शेतकऱ्याचे देव आहेत असे शेतकरी सचिन बंडगर यांनी सांगितले.
सदर शेतकरी आनंद मेळाव्यात शेतकरी रशीद काझी, संजय रणवरे, भारत भोसले, विष्णू किरगट, सुरेश बाबर, सुनील धोपे, धोंडीराम मिसाळ, बाबुराव ढेकळे, भाऊसाहेब कवडे, रोहित काशीद, विजय पाटील, सोमनाथ कोरके, मारुती कोळी, नंदकुमार सावंत, दिनकर खंडागळे, सतीश झंजे, सौरभ कुलकर्णी, प्रणव वावरे, आनंद मदने, वैभव महानवर, सुभाष गायकवाड, धनेश्वर सावंत, सचिन माळी, नितीन आर्वी, अतुल तोंडले, संजय गोडसे, धनंजय नरसाळे, विशाल शिंदे इत्यादी शेतकऱ्याचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार दिगंबर पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *