सांगोला विद्यामंदिरचे तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश; खेळाडूंची पदकांवर दिमाखदार मोहोर.. सांगोला (प्रतिनिधी) :जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या वतीने ६ व ७ ऑक्टोबर २०२६ रोजी तालुका क्रीडा संकुल सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत पदकांवर दिमागदार मोहोर उमटवली.या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात धनराज सागर बनसोडे याने १०० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. सोहम शामसुंदर वेंडोले याने लांब उडी व उंच उडीमध्ये प्रथम तर २०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक मिळवला. सुयोग धीरजकुमार मुळे याने २०० मीटर धावण्यात द्वितीय, तर आदर्श शशिकांत बनसोडे याने लांब उडीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच आदर्श बनसोडे, श्लोक मुळे, धनराज बनसोडे, सोहम वेंडोले व दीक्षांत क्षीरसागर यांच्या संघाने ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. १७ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आयुष संजय पाटील याने ११० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.तसेच १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात करण शिवाजी भोसले याने ११० मीटर हर्डल्समध्ये प्रथम तर १०० व २०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक मिळवला. ऋषिकेश रामचंद्र येलपले याने थाळीफेकीत प्रथम क्रमांक प्राप्त केला. करण भोसले, सचिन चव्हाण, सुमित चव्हाण, श्रवण बनकर व रोहित चौगुले यांच्या संघाने ४ बाय ४०० मीटर रिले धावणे प्रकारात प्रथम तर ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.मुलींच्या गटातही प्रशालेच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली. १७ वर्षे वयोगटात ज्ञानेश्वरी हणमंत बाबर हिने १०० मीटर धावण्यात तर रितिका रमेश मोकाशी हिने गोळाफेकीत प्रथम क्रमांक मिळवला. ज्ञानेश्वरी बाबर, श्रद्धा व्हनमाने, मयुरी साळे, रितिका मोकाशी व राजनंदनी चव्हाण यांच्या संघाने ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. १९ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये धनश्री नवनाथ भुसे हिने २०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, सोनाली धुळा ठेंगल हिने ४०० व ३००० मीटर धावणे प्रथम क्रमांक, माधवी दत्तात्रय पाटील हिने उंच उडी प्रथम क्रमांक, तर अश्विनी पांडुरंग घाडगे हिने ११० मीटर हर्डल्स व लांब उडीत प्रथम आणि तिहेरी उडीत द्वितीय क्रमांक मिळवला. शिवानी बिराप्पा खरात हिने थाळीफेकीत द्वितीय तर पल्लवी दत्तात्रय येलपले हिने थाळीफेक व गोळाफेकीत तृतीय क्रमांक मिळवला. तसेच अश्विनी घाडगे, धनश्री भुसे, अश्विनी वाघमोडे, समृद्धी पाटील व सोनाली ठेंगल यांच्या संघाने ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये प्रथम तर ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला.या सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार संस्थेचे खजिनदार शंकरराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक शुभांगी घोंगडे, मकरंद अंकलगी व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुभाष निंबाळकर यांच्यासह प्रशाला क्रीडा विभाग प्रमुख सुनील भोरे, ज्युनिअर कॉलेज क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डी.के. पाटील, क्रीडा शिक्षक नरेंद्र होनराव,प्रा.संतोष लवटे,स्नेहल देशमुख,प्रा.सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था उपाध्यक्ष ॲड.विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य, पर्यवेक्षक काकासो नरोटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. Post navigation नाझरे येथे नाझरा फेस्टिवल नवरात्र मंडळातर्फे विविध स्पर्धेचे आयोजन..- दादासो हरिहर शेतकरी राजा आनंदी व समृद्धी होण्यासाठी दिवाळी आनंद मेळाव्याचे आयोजन.. प्रा. राम मुखेकर /शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मान सोहळा साजरा.