सांगोला विद्यामंदिरचे तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत घवघवीत यश; १४ वर्षे वयोगट संघाचे शानदार विजेतेपद सांगोला (प्रतिनिधी) :जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय १४ वर्षे वयोगट क्रिकेट स्पर्धेत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेत सांगोला विद्यामंदिरच्या संघाने साखळी सामन्यात उत्कर्ष विद्यालय व सिंहगड स्कूल कमलापूर यांचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली व अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल सांगोला या संघाचा पराभव करत निर्विवाद विजेतेपद पटकावले आहे.या विजेत्या क्रिकेट संघामध्ये श्रेयश ढाकणे (कर्णधार) ईशान कांबळे, प्रणव केदार,अर्णव मुंढे,कुणाल खिलारे, सार्थक माळी, विराज भोसले, पियुष शेजवळ, सत्यम पाटील, साई शेंडे, शौर्य नवले, तेहजीब मुल्ला, अब्दुलमन्नान मुजावर आणि आदर्श बनसोडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी मैदानावर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या यशस्वी खेळाडूंचा सत्कार संस्थेचे खजिनदार शंकरराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक शुभांगी घोंगडे मकरंद अंकलगी व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक नरेंद्र होनराव व प्रा.प्रशांत बुरांडे,प्रशाला क्रीडा विभाग प्रमुख सुनील भोरे, ज्युनिअर कॉलेज क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डी.के.पाटील, क्रीडा शिक्षक प्रा.सचिन चव्हाण,सुभाष निंबाळकर,प्रा.संतोष लवटे आणि स्नेहल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,संस्था उपाध्यक्ष ॲड. विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके,विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य,पर्यवेक्षक काकासो नरूटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Post navigation सांगोला येथे SCT वैदिक तंत्रज्ञानाचा भव्य दिवाळी आनंद मेळावा… माण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ढोकमोडा हिंगणीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.