आनंद लॉन्स सांगोला येथे SCT वैदिक तंत्रज्ञानाचा भव्य दिवाळी आनंद मेळाव्याचे आयोजन..
शेतकरी बांधवांसाठी शेती व पशुपालन क्षेत्रातील मार्गदर्शनाची सुवर्णसंधी..


सांगोला प्रतिनिधी


शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व शेतीतील उत्पादन वाढवून खर्च कमी करण्यासाठी मार्गदर्शन मिळावे तसेच शेती व पशुपालन क्षेत्रातील मार्गदर्शन व ज्ञान मिळावे यासाठी आनंद लॉन्स वासुद रोड सांगोला येथे गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर सकाळी दहा वाजता SCT वैदिक तंत्रज्ञानाचा भव्य दिवाळी आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे.
SCT जनक राम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मेळावा होणार असून, यामध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत तसेच यावेळी शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा ही होणार आहे तरी सांगोला व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी व पशुपालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी सावंता बोराटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *