(अजित जगताप)
सातारा दि: न्हाळेवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये जय या अडीच वर्षाच्या लेकराचा बिबट्याच्या हल्ल्यात घराच्या अंगणातच जीव गेला आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनंतर यापुढे बिबट्याचा बंदोबस्त केला नाही. तर वन खात्याला धडा शिकवला जाईल असा कडक इशारा सामाजिक कार्यकर्त्या पूजा बनसोडे यांनी दिला आहे. आज दुर्दैवी श्री खंडागळे यांच्या घरी भेट देऊन त्यांनी सांत्वन केले. यावेळी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे व मान्यवर उपस्थित होते.

शनिवारी ३ ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजता न्हाळेवाडी येथील वीजपुरवठा खंडित झाला आणि घात झाला. अर्थात वीज पुरवठा खंडित होणे ही नवीन बाब नाही. सातारा जिल्ह्यातील तीन पिढ्यांनी विजेचा लपंडाव पाहिला आहे. पण डोक्यात कधी प्रकाश पडला नाही. उलट प्रस्थापित घराण्याची सत्ता पुन्हा एकदा प्रस्थापित व्हावी. यासाठी अनेकांचे हातभार लागले. शनिवार हा घात वार ठरल्यामुळे खऱ्या अर्थाने मन पिळवटून निघालेले आहे. आजही त्या चिमुकल्या जीवाची चिमुकली पावले नजरेसमोरून जात नाही. नावातच जय असणाऱ्या या बाळाला,,, आपल्या आयुष्याची दोरी पराजय होताना पहावी लागली आहे. लघुशंका निमित्त होते. आणि बिबट्याच्या रूपाने नियतीने डाव खेळला.

आपल्या न्हाळेवाडी येथील घराच्या अंगणामध्ये निर्दास्त व निर्भीडपणाने लघुशंकासाठी आलेल्या जय वर बिबट्याची नजर पडली. अंधारात दाब धरून बसलेल्या बिबट्याने जयची मान पकडून त्याला शेजारी उसाच्या शेतात घेऊन गेले. ज्याला घेऊन जाताना पडलेल्या रक्ताने घरातील लोकसुद्धा घाबरून गेली. या रक्ताचा मार्ग काढत उसाच्या शेतात गेले असता त्या ठिकाणी निश्चित पडलेला जय पाहून अनेकाने हंबरडा फोडला. मोठ्या आशेने ज्याला क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. पण, तोपर्यंत जयची प्राणज्योत मालवली होती.
न्हाळेवाडी येथील जय संदीप खंडागळे हा अवघ्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडावे लागले. रक्षणासाठी खडांगळे कुटुंबीयांनी एक कुत्रा पाळला होता. परंतु ,त्यावेळी हा कुत्रा जाळीतील पिंजऱ्यात बंदिस्त होता. खरं म्हणजे बिबट्याची शिकार हा कुत्राच होता. पण, नियतीला हे मान्य नसल्यामुळे जय बिबट्याच्या तावडीत सापडला. या सर्व घडामोडीनंतर वन विभाग, वीज वितरण कंपनी यांच्या विरोधात ग्रामस्थांचा आक्रोश पाहण्यास मिळाला.
कास पठारावर धन दांडग्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या वन विभागाला खरं म्हणजे मार्केटिंग व फुलांच्या नावाने पैसा गोळा करण्याचे व्यसन जडले आहे. याला अनेकांचा हातभार लागत असला तरी न्हाळेवाडी येथील घटनेने वनविभागाची नाचक्की झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश तथा सोन्या साबळे यांनी तर वन विभागावर मनुष्यवधचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थ संतप्त झाले असून कितीही आर्थिक मदत झाली? तरी जय परत येणार नाही. यापुढे कोणत्याही माणसावर जंगली प्राण्यांनी हल्ला केला. तर त्याची किंमत आता सातारा जिल्ह्यातील वन खात्याला मोजावे लागेल. यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही. असे इशारा यावेळी माझी कार्यकर्ते पूजा बनसोडे यांनी दिला. न्हाळेवाडी अनेक ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. घटना घडल्यानंतर दोन दिवस झाले. अद्यापही भीतीचे वातावरण आहे. संबंधित बिबट्याला जिरेबंद करण्यासाठी वन विभागाने काय उपाययोजना केली? हे अद्यापही समजू शकले नाही.


फोटो– न्हाळेवाडी तालुका सातारा येथील खंडागळे कुटुंबियांचे सांत्वन करताना जि. प. अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे व पूजा बनसोडे (छाया- निनाद जगताप, सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *