मुरूम, ता. उमरगा येथे येथे तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला याप्रसंगी संघाचे अभिनंदन करताना मुख्याध्यापिका, क्रीडाशिक्षक (मुरूम प्रतिनिधी) येथे आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.शाळेच्या विजेत्या संघात अरशू साठे, सर्वेश्वर बेदाडे, फजल शेख, आदर्श गोरे, आशुतोष बाबर या विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळ, आत्मविश्वास आणि संघभावनेचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.या यशामागे क्रीडा शिक्षक मंडले सर, सुजित शेळके, प्रा. नारायण सोलकर यांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा ठरला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, माजी प्राचार्य सच्चिदानंद अंबर यांनी त्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून पालक व शिक्षकवर्गातूनही विजेत्या संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. …. Post navigation जय बाळ, परत येऊ शकत नाही. पण , यापुढे बिबट्याचा बंदोबस्त करा- पूजा बनसोडे हिरकणी नवदुर्गा पुरस्कार २०२६: विद्या मोरे (रेठरे हरणाक्ष) यांचा होणार विशेष सन्मान; राहुल खरात यांच्याकडून अभिनंदन!