…माण तालुक्यातील राजकारण पेटले, सभापती विक्रम शिंगाडे यांचेवर गुन्हा दाखल….….धनगर व अल्पसंख्याक वाद पेटविण्याचा प्रयत्न………म्हसवड वार्ताहर… .. …….राजकीयदृष्ट्या विक्रम शिंगाडे यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी बदनाम केले आहे. व धनगर समाज व अल्पसंख्याक समाजात तेढ निर्माण करीत आहेत.असे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते व माण पंचायत समितीचे सदस्य अर्जुन काळे यांनी म्हसवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले..माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे व त्यांच्या सहकर्यावर म्हसवड पोलीसात दमदाटी व विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.यावरून माण तालुक्यातील राजकारण पेटले आहे.माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व विक्रम शिंगाडे यांच्या समर्थकांनी म्हसवड पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करुन भाषणबाजी केली होती.. यामध्ये धनगर समाज व अल्पसंख्याक समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.. अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत..या साठी माण तालुक्यातील भाजपचे नेते व धनगर समाजातील नेते, व कार्यकर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत व्यक्त केले.यावेळी अर्जून काळे हे बोलत होते.यावेळी डॉ प्रमोद गावडे, डॉ वसंत मासाळ, दादासाहेब काळे, वसंत बनगर, नगराध्यक्ष सचिन वीरकर, माजी नगरसेवक अप्पासाहेब विरकर, नगरसेवक दिपक बनगर, सचीन पुकळे, माजी नगरसेवक पोपट मासाळ, लक्ष्मण वीरकर, अजित बनगर,इत्यादी अनेक धनगर समाजाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.डॉ प्रमोद गावडे म्हणाले, माण तालुक्यातील वैयक्तिक भांडणाला जातिय रंग देण्याचा प्रयत्न काही पुढारी करीत आहेत, मात्र माण तालुक्यातील जनता सुज्ञ आहे.. अशा थापाना जनता भुलणार नाही, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माण तालुक्यातील विकास होत आहे. हे विरोधकांना सहन होत नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी दादासाहेब काळे म्हणाले, हे प्रकरण पोलीस तपासात आहे. पोलीस याबद्दल सत्य परिस्थिती समोर आणतील, पण काही लोकांना न्यायाधिश होण्याची घाई झाली आहे.. ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पाणी पोहचविले आहे.. हे विरोधकांना पहावत नाही म्हणून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वर चिखलफेक करत आहेत.. विक्रम शिंगाडे यांचें व विनयभंग गुन्हा दाखल झाला नसून याबाबत पोलीस तपास सुरू आहे.. पण त्यांच्या समर्थकांनी त्यांना बदनाम करणे सुरू केले आहे. सदाशिव बनगर म्हणाले, सभापती विक्रम शिंगाडे यांनी अपरात्री एका अल्पसंख्याक कुटुंबावर अन्याय करुन दमदाटी करून शिवीगाळ केली ही घटना निंदनीय आहे.. अशा प्रकारच्या घटना धनगर समाज कधीच सहन करणार नाही, धनगर समाज कधीच कुणावर अन्याय करत नाही..डॉ वसंत मासाळ, सदाशिव बनगर, अजित बनगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.… Post navigation केंद्र शाळा पुळकोटी यांच्या वतीने केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धा संपन्न.. दुष्काळग्रस्त शेतांच्या बांधावर पालकमंत्री जयकुमार गोरे; पंचनामे आणि मदतीच्या उपाययोजनांवर भर