(अजित जगताप) कुडाळ दि: 28 सप्टेंबर

महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागाच्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील जावळी व इतर तालुका वगळता राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यामुळे बारा विविध सवलती व सूट आणि विकास कामे सुरू झाल्याने २६५ तालुक्यातील जनतेने लोकप्रतिनिधीचे आभार मानले आहेत.

भाजपा बालेकिल्ला असणाऱ्या जावळीला दुष्काळ यादीत मिळेना सावली अशी स्थिती पाहण्यास मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय पक्षप्रवेशाने भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या जावळी तालुक्याला या दुष्काळातून वगळण्यात आले आहे. याबाबत जावळी तालुक्यातील कर्तव्यदक्ष भाजप पक्षाकडून आंदोलन होणार नाही. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. असे शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. महाराष्ट्रात जून पासून सुपर एल नॅनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम महाराष्ट्रातील २६५ तालुक्यातील अभ्यासू व कृषी नाळ असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी केल्यामुळे या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. आता जमीन महसूल येथील सूट, पीक कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज पंपाच्या वीज बिला अगोदरच माफ करण्यात आले. त्यावरील वीज पंपांना सदर सुट, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कामाच्या निकषात सवलत ,पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, दुष्काळ जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीला पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, शेतीवर अवलंबून असणाऱ्या अल्पभूधारक व शेतकरी, शेतमजूर यांना अन्नधान्याची टंचाई होणार नाही. यासाठी अन्नपुरवठा करणे, पाळीव जाणारांना चारा उपलब्ध करणे, जलसंधारणाची कामे करणे, यामध्ये प्राधान्याने पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी व चारा उपलब्ध करण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे. जावळी तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून सुद्धा तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर नसल्यामुळे शिवसेनेचे सातारा जिल्हा सह संपर्कप्रमुख व जावळीचे सुपुत्र एकनाथ ओंबळे, संदीप पवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रकाश परामणे व दुष्काळाची झळा सहन करणारे शेतकऱ्यांनी आवाज उठवण्यासाठी सज्ज झाले आहेत. वास्तविक पाहता जावळी तालुक्यात दुष्काळ जाहीर व्हावा. अशी अपेक्षा शेतकरी वर्गासोबतच काही राजकीय पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची आहे. परंतु, आता दुष्काळ जाहीर न झाल्यामुळे अनेकांना आता एरवी विविध प्रश्नासाठी भाजपसाठी अनुकूल प्रश्नांवर आंदोलन करत होते. त्यांना दुष्काळासाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. तर दुसऱ्या बाजूला जावळीतील महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकार दरबारी प्रश्न उपस्थित करण्यासाठी बैठकांचे नियोजन केले आहे. जावळी तालुक्यातील करहर, कुडाळ, सायगाव, केळघर, तापोळा परिसरातील अनेक नगदी पिकांचे नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी पिके अपेक्षित पाऊस पडलेला नसल्याने वाळून गेली आहेत. वास्तविक पाहता दुष्काळ परिस्थिती असून सुद्धा याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाहणी दौरा करून दुष्काळाची झळा सोसणाऱ्या जावळीतील काही शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे होते. परंतु, काही शेतकरी जिल्हा बँकेच्या सहलीला गेल्यामुळे त्यांना दुष्काळाची तीव्रता जाणवली नाही. अशी आता टीका होऊ लागलेली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमुळे सध्या जावळी तालुक्यातील विकास सेवा सोसायटीच्या ठराव झालेल्या काही शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश मध्ये सहलीला घेऊन गेल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना नसल्याची त्यांनी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात झालेल्या पत्रकार संवादाच्या वेळेला स्पष्ट शब्दात कबुली दिली आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. जी गोष्ट माहित नाही. त्याबद्दल भाष्य करणे त्यांनी टाळले आहे. जावळी तालुक्यातील खेड्यापाड्यातील सामान्य ग्रामपंचायत सदस्यांना शेतकऱ्यांच्या सहली बाबत कल्पना आहे. आता जावळीमध्ये दुष्काळ नसल्याने विकास कामांमध्ये गतिमान असलेल्या जावळीला राज्य सरकारने प्रगतशील शेती व शेतकरी पुरस्कार द्यावा. अशी उपरोधात्मक मागणी सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी वर्गाने केली आहे. दरम्यान संबंधित अहवाल तयार करणाऱ्यांनी कोणत्या निकषावर तो तयार केला याची माहिती द्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जाधव, रवींद्र जगताप व विकास शिंदे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *