सद्गुरु सदाशिव शिवाचार्य वेळापूरकर महास्वामीजी यांच्या शिरपेचात मानाचा तुरा..
महास्वामीजींचा श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय सन्मान संपन्न


सांगोला प्रतिनिधी
शिक्षण, समाजसेवा, धार्मिक, सांस्कृतिक मानवतावादी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यासाठी आयोजित केलेल्या ग्लोबल अचीवर्स पुरस्कार 2026 या प्रतिष्ठित पुरस्काराने श्री ष. ब्र. 108 सद्गुरु सदाशिव शिवाचार्य महास्वामीजींचा श्रीलंकेत गौरव करण्यात आला. धार्मिक व आध्यात्मिक कार्यासोबतच समाजातील वंचित, गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी सातत्याने करण्यात येणाऱ्या विविध समाज उपयोगी उपक्रमाची दखल घेत त्यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.
महास्वामीजी चे जनजागृती चे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून, अनिष्ट प्रथा त्यांनी बंद केल्या तसेच मठाच्या माध्यमातून गुरुकुल चालवून संस्कारक्षम शिक्षण देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. यामध्ये श्री ष. ब्र. 108 सद्गुरु सदाशिव शिवाचार्य महास्वामीजींच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. त्यामुळे महास्वामीजीवर सध्या फुलांचा वर्षाव होत आहे व त्यांच्या कार्याचे सर्वत्र भक्तगणात कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *