सांगोला विद्यामंदिरमध्ये उद्या संत विचारांचा महाजागरअमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १० हजार विद्यार्थ्यांना तुकोबांची ‘अभंग पंचविशी’ व शिक्षकांना ‘गाथा’रूपी ज्ञानप्रसाद. सांगोला (प्रतिनिधी) आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत आणि नैराश्यात भरकटत असताना त्यांना संत विचारांचा भक्कम आधार देत जगण्याची योग्य दिशा दाखवण्यासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अमृत महोत्सवी वर्ष व श्रीमुनी गणपत घेरडे मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला,श्रीमुनी गणपत घेरडे मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट आणि जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान (पुणे) यांचे संयुक्त विद्यमाने या महाज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे हा भव्य अभंग पंचविशी व ग्रंथदान सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने १० हजार विद्यार्थ्यांना तुकोबांची अभंग पंचविशी तर संस्थेतील साडेतीनशे शिक्षकांना तुकाराम गाथा सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.संत तुकाराम महाराज हे समाजातील अंधश्रद्धा,अनिती आणि विषमतेवर कठोर प्रहार करणारे एक महान समाजसुधारक होते.डिजिटल जनरेशनच्या वाढत्या समस्या,नैराश्य व करिअरच्या ताणतणावावर मात करण्यासाठी संत साहित्यातील प्रगल्भ विचार खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया रचतील. तसेच विज्ञानाची कास आणि भक्तीचा आधार यांची सांगड घालत संतांचा मानवतावादी विचार हाच सुदृढ समाजाचा व प्रशासनाचा खरा पाया आहे हा व्यापक वैचारिक संदेश या ग्रंथदान सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.या प्रेरणादायी सोहळ्यासाठी प्रशासकीय, राजकीय आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,जि.प.सोलापूचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल रश्मी जयकुमार जैन, सांगोला विधानसभा सदस्य आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, म्हाडाचे (पुणे मंडळ) मुख्य अधिकारी राहुल साकोरे,सा.बां.प्रा.वि. (पुणे) चे मुख्य अभियंता अनिल पवार, डॉ.आंबेडकरी शेती विकास व संशोधन संस्थेचे ललित बाबर,वारी आपल्या दारीचे मार्गदर्शक अविनाश काकडे आणि सोलापूरचे आंतरराष्ट्रीय चित्रकार सचिन खरात यांचेसह सांगोला तालुका व सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढविणार आहेत.या ज्ञानमय सोहळ्याच्या आयोजनाची माहिती स्वागतोत्सुक सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,श्रीमुनी मेडिकल ट्रस्टचे सचिव डॉ.सुदर्शन घेरडे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. अशोकराव काळे यांनी दिली आहे.चौकट– गुरुवर्यांचा ज्ञानवारसा आणि सामाजिक बांधिलकीची वाटचाल सांगाला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी सांगोल्यात शैक्षणिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवत विद्यार्थ्यांच्या केवळ बौद्धिक नव्हे तर रचनात्मक विकासाचा ध्यास घेतला होता. त्यांचा हाच लोकोत्तर विचार प्रमाण मानून संस्थेने अमृत महोत्सवी वर्षात सामाजिक बांधिलकी जपत अनेक दिशादर्शक उपक्रम राबवले आहेत.यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी डीआरडीओचे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अशोक नगरकर यांचे विशेष व्याख्यान,लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान करणारा सांगोला तालुका पत्रकार कार्यशाळा व कृतज्ञता सोहळा आणि देशरक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा माजी सैनिकांचा रक्षाबंधन सोहळा आयोजन महत्त्वपूर्ण आहे.गुरुवर्यांनी रुजवलेली हीच परंपरा पुढे नेत, केवळ शालेय शिक्षण न देता संत साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांची नैतिक जडणघडण करणे हे या महाग्रंथदान सोहळ्याचे सर्वांत मोठे वेगळेपण असून हा ज्ञानयज्ञ गुरुवर्य बापूसाहेबांच्या वैचारिक परंपरेतील एक सुवर्णक्षण ठरणार आहे. Post navigation ज्ञानदानापासून समाजकार्यापर्यंत निवृत्तीनंतरही अखंड ध्येय यज्ञ जोपासणारे केदार गुरुजी.. सुरेश ढोले सेवानिवृत्ती केंद्रीय मुख्याध्यापक भाजपा बालेकिल्ला जावळीला दुष्काळाच्या यादीत मिळेना सावली. जावली यादीत नाही..