म्हसवड (प्रतिनिधी):क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून कृषिरत्न विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर दाम्पत्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा पाया भक्कमपणे उभा केला असून त्यांचे शैक्षणिक कार्य क्रांतिवीरांच्या नावाप्रमाणेच गौरवशाली असल्याचे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी म्हसवड येथे केले. कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड संस्थेच्या रौप्य महोत्सव निमित्त आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी संस्थेला सदिच्छा भेट दिली. (क्रांतिवीर संकुलात मार्गदर्शन करताना आमदार डॉ. विश्वजीत कदम कृषिरत्न विश्वंभर बाबर) म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात आयोजित विशेष सत्कार सोहळा व सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते., आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी क्रांतिवीर शैक्षणिक संकुलास सदिच्छा देऊन संस्थेच्या कार्याची पाहणी केली. उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करताना डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, “आदरणीय स्व. पतंगराव कदम साहेबांनी आयुष्यभर जात, धर्म आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन लोकांना मदत करण्याची शिकवण दिली. त्यांनीही शून्यातूनच शैक्षणिक कार्याची सुरुवात केली होती. आज कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर दाम्पत्यांनी अत्यंत कष्टाने ही नामांकित संस्था उभी केली आहे, याचा मला मनःपूर्वक आनंद असल्याचे स्पष्ट केले. संस्था सुरू करणे सोपे आहे मात्र चालवणे खूप अवघड असल्याचे त्यांनी सांगितले. बाबर दाम्पत्यांनी शून्यातून संघर्षातून उभे केलेल्या क्रांतिवीर शैक्षणिक संकुलास आपण ताकतीने व राजकारण बाजूला ठेवून साथ देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या आदरातिथ्याने झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी मा. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांना माणदेशी काठी आणि घोंगड देऊन यांचा संकुलाच्या वतीने नागरी सत्कार केला. आपल्या प्रास्ताविकात प्रा. विश्वंभर बाबर यांनी पूर्वीच्या संवाद पदयात्रेच्या आठवणींना उजाळा दिला. या पदयात्रेपासून जोडलेले हे प्रेमाचे आणि विचारांचे धागे राजकारण बाजूला ठेवून असेच पुढेही घट्ट ठेवण्याबाबत सूचित केले. तसेच भारती विद्यापीठाचा वटवृक्ष आणि क्रांतिवीर संकुल यांच्यातील ऋणानुबंध कायम राहावेत अशी भावना त्यांनी मांडली. रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण केलेल्या या संकुलात आज १४ ते १५ गावांतील २५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्या पद्धतीने गौरव उद्गार काढले. या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या संकुलातील गुणवंत विद्यार्थी स्नेहा पांडुरंग काटकर, प्रांजल उज्ज्वल कुमार काळे, अनुष्का मंगरूळे, संस्कृती जयंत ढाले, आदित्य बाबुराव घाडगे आणि नदीम अकील काझी या विद्यार्थ्यांचा आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कुंडल चे ज्येष्ठ नेते किरण तात्या लाड, कुंडलिक नाना येडके, नितीन दोशी, सोमनाथ भोसले, विशाल बागल, संजय शेठ बागल, काकासाहेब माने, विकास गोंजारी, अकिल काझी, डॉ. उज्ज्वल कुमार काळे तसेच संस्थेच्या सचिव व आदर्श मुख्याध्यापिका सौ. सुलोचना बाबर, क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य श्री. विन्सेंट जॉन, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. विठ्ठल लवटे, विजय बनसोडे, अनिल लोखंडे, महेश करचे, सागर सावंत, पंकज पोळ, वसंतराव शिर्के , दाऊद मुल्ला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक अभिजित सावंत तर उपस्थितांचे औपचारिक आभार संस्थेच्या सचिव, मुख्याध्यापिका सौ. सुलोचना बाबर यांनी मानले. Post navigation आटपाडीत विलासजी खरात यांचा भव्य सत्कार; ‘डबई कुरण’ जमिनीच्या ऐतिहासिक विजयाचा मानदेशात जल्लोष! शिक्षण मंडळ सचीव दिपक माळी यांची वीरकर वाडी जि.प. शाळेला भेट.