गुडगुंटी प्रतापगड साखर कारखाना बुधवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी बॉयलर अग्नी प्रदीपन (अजित जगताप )सोनगाव दि: जावळी तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखाना व गुडगुडी शुगर्स अॅण्ड बायोएनर्जीजप्रा. लि; सोनगांव-करंदोशी या साखर कारखाना बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभबुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी रोजी दुपारी १.०० वा. वामन जयंतीच्या दिवशीगुडगुंटी प्रतापगड शुगर्स अॅण्ड बायोएनर्जीज प्रा. लि; सोनगांव-करंदोशी, ता. जावली, जि.सातारा येथे मोठ्या उत्साहात होणार आहे. प्रतापगड सहकारी साखर कारखाना लि; चेअरमन व जावळी पंचायत समिती, सभापती श्री सौरभ राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते वश्री. विरुपाक्षय्या जगदीश गुडगुंटीचेअरमन, गुडगंटी प्रतापगड शुगर्स अॅण्ड बायोएनर्जीज प्रा. लि; तसेच प्रतापगड सहकारी साखर कारखाना मार्गदर्शक संचालिकाश्रीमती सुनेत्रा राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचेसंचालक, श्री.विजय महादेव शेवते व त्यांच्या सुवद्य पत्नी सौ. हेमा विजय शेवते यांच्या हस्तेबॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे सन्मानीय सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार,ऊस तोडणी मजूर, व्यापारी, कार्यकर्ते व हितचिंतक या सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित रहावे. ही विनंती श्री.एम. एम. हिरेमठ,चिफ जनरल मॅनेजर – युनिट हेडगुडी प्रतापगड शुगर्स अॅण्डबायोएनर्जीज प्रा. लि. यांनी केली आहे. या कार्यक्रमासाठी प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे व सर्व संचालक जय्यत तयारी करत आहेत.. प्रतापगड सहकारी साखर कारखाना लिमिटेड हा जावळी तालुक्यातील एकमेव आणि महत्त्वाचा सहकारी औद्योगिक प्रकल्प आहे. ९ नोव्हेंबर १९९६ रोजी महाराष्ट्रात सेना भाजप युतीचे सरकार असताना सोनगाव-करंदोशी तालुका जावळी या ठिकाणी आदरणीय माजी आमदार लालसिंगराव शिंदे, आदरणीय राजेंद्र शिंदे यांनी अथक परिश्रमातून सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने या कारखान्याची उभारणी केली.या कारखान्याची दैनिक ऊस गाळप क्षमता २,५०० मेट्रिक टन ( टी सी डी) एवढी आहे. अलीकडच्या गळीत हंगामात कारखान्याने सुमारे सव्वातीन लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले . कारखाना व्यवस्थापनाने आणि ‘अजिंक्यतारा-प्रतापगड उद्योग समूहाने’ यापूर्वी हंगामात ३.५ लाख ते ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरवले होते. प्रतापगड साखर कारखान्यात थेट आणि कंत्राटी (हंगामी) पद्धतीवर मिळून अंदाजे ४०० ते ६०० पेक्षा जास्त कर्मचारी व ऊस तोडणी आणि वाहतुकीशी संबंधित असणारे हजारो ऊसतोड मजूर, मुकादम , ऊस वाहतूकदार यामध्ये सहभागी होतात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा. साखर कारखाना सुस्थितीत व व्यवस्थित चालवा यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो- जावळी तालुक्यातील एकमेव प्रतापगड सहकारी साखर कारखाना Post navigation शिवसेना नेते सागर दादा पाटील यांच्या शुभहस्ते वझरे येथे गुणवंताचा गौरव संपन्न.. आटपाडीत विलासजी खरात यांचा भव्य सत्कार; ‘डबई कुरण’ जमिनीच्या ऐतिहासिक विजयाचा मानदेशात जल्लोष!