नाझरे प्रतिनिधी
वझरे ता. सांगोला येथे उत्तम सरगर सर यांची कोळा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी नियुक्ती, श्वेता कारंडे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभियंता नियुक्ती, रत्नप्रभा जुंदळे रेड्डी यांची पवित्र पोर्टल मधून शिक्षक पदी नियुक्ती, प्रशांत सरगर यांची पवित्र पोर्टल मधून स्वामी विवेकानंद संस्थेत सहशिक्षक नियुक्ती व संतोष पाटील यांची पवित्र पोर्टल मधून जिल्हा परिषद सोलापूर मधून वझरे येथे प्राथमिक शिक्षक नियुक्ती बद्दल या सर्व गुणवंतांचा गौरव श्री दत्त मंदिर वझरे.. नाझरे येथे शिवसेना नेते सागर दादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे व उपसभापती अजय सरगर यांच्या शुभहस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी मा. सरपंच राजू पाटील, भिकू वाघमारे, बाबुराव जुंदळे, उद्योगपती समाधान यादव, मा. उपसरपंच सचिन कोकरे, मा. प्राचार्य के वाय पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक धोंडाप्पा जुंदळे, शिक्षक उत्तम जुंदळे, मा. ग्रामपंचायत सदस्य वसंत पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष कोकरे, प्रगतशील शेतकरी विजय कोटी, बालाजी पलसंडे, दत्ता पाटील, राजू कोटी, राहुल कोटी, तमा पाटील, स्वप्निल रेड्डी, बाबासाहेब कारंडे, बापू पाटील, संतोष पाटील, महेश रायचुरे, लक्ष्मी पाटील, जीवन जुंदळे, रुद्र जुंदळे, अनिल रेड्डी, विनायक सरगर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *