आटपाडी डबई कुरणातील शेतजमिनीचा शासन निर्णय; लांडगे परिवाराकडून आयुष्यमान विलास खरात व सहकाऱ्यांचा विटा येथे नागरी सत्कार
​विटा (विशेष प्रतिनिधी):
आटपाडी येथील डबई कुरणातील शेतजमिनीबाबत शासनाकडून महत्त्वपूर्ण आदेश (ऑर्डर) प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर, लांडगे परिवाराच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक आयुष्यमान विलास खरात यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा विटा येथे शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
​हा सत्कार सोहळा स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष केरू लांडगे यांच्या शुभहस्ते पार पडला. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या या जमिनीच्या प्रश्नावर शासनाकडून सकारात्मक निर्णय मिळवण्यात आयुष्यमान विलास खरात व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिल्याने लांडगे परिवाराच्या वतीने हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.
​या प्रसंगी लांडगे परिवारातील सत्यवती सुभाष लांडगे, योगेश सुभाष लांडगे, रूपाली योगेश लांडगे, विनोद सुभाष लांडगे, शुभांगी विनोद लांडगे, तसेच कु. पियुषा योगेश लांडगे, कु. प्रतीक्षा योगेश लांडगे आणि कु. समरजित विनोद लांडगे उपस्थित होते.


​तसेच सत्कारार्थी मान्यवरांमध्ये आयुष्यमान विलास खरात यांच्यासोबत आयुष्यमान उत्तम मोटे, नंदकुमार खरात, संतोष मोटे, अशोक मोटे आणि सागर मोटे हे उपस्थित होते. उपस्थितांनी या यशाबद्दल विलास खरात व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *