म्हसवड… प्रतिनिधीविद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच गणेश उत्सवानिमित्त समाजात सुयोग्य पर्यावरण संवर्धन संदेश पोहोचवण्यासाठी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणपती बनवून सामाजिक बांधिलकीचा एक आगळा वेगळा संदेश दिला आहे.बदलत्या जीवनशैलीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये बनवलेल्या गणेश मूर्तीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. सदर मूर्ती विसर्जना वेळी विरघळत नसल्याने प्लास्टर ऑफ पॅरिस निसर्गाला घातक ठरत असून प्रदूषण वाढत आहे . यावर उपाय म्हणून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी माती पासून पर्यावरण पूरक गणपती बनवले. मातीचा चिखल करणे, गणपती बनवणे, तसेच सजावट व रंगतरंगोटी करणे इत्यादी कारणामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण पूरक गणपती बनवणे ही संकल्पना खूपच चांगल्या प्रमाणात रुजली व वाढली आहे. या उपक्रमात शाळेतील 525 विद्यार्थ्यांनी सहभागी घेऊन अतिशय आकर्षक गणेश मूर्ती बनविल्या. प्रदूषण कमी करण्यासाठी व निसर्ग संवर्धनासाठी क्रांतिवीर शाळेतील विद्यार्थ्यांनी एक लहानसा प्रयोग करून राष्ट्र उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केल्याची माहिती सुलोचना बाबर यांनी दिली. या उपक्रमात विद्यार्थ्यांना उपशिक्षक अनिल काटकर, दस्तगीर आतार , पुनम जाधव, संजय नरळे यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख पुनम कोकणे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यानिमित्ताने गणपती मूर्ती बनवण्याचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.बालचमू विद्यार्थ्याने बनवलेल्या गणेश मूर्ती प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरी नेण्याचा निर्णय घेतला असून सजावटीच्या माध्यमातून घरी त्याची स्थापना केली जाणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. Post navigation विजेच्या लपंडावामुळे पिंपोडे बुद्रुक परिसरात शेतकरी त्रस्त; बहरात आलेली पिके लागली कोमजू, महावितरणविरोधात संतापाची लाट मासाळवाडी (म्हसवड) येथे अंगणवाडी वेलकम मेळावा उत्साहात संपन्न