सांगोला विद्यामंदिरमध्ये लेझीमच्या तालावर आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहात ‘श्रीं’ची दिमाखदार प्रतिष्ठापना सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये यंदाचा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि अफाट उत्साहात सुरू झाला आहे. लेझीमचा ताल,टिपरी नृत्य आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात ‘श्रीं’ची दिमाखदार प्रतिष्ठापना करण्यात आली. उत्सवाची सुरुवात झपके वाड्यामध्ये झाली. तेथे संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रफुल्लचंद्र झपके यांच्या हस्ते ‘श्रीं’ची विधिवत पूजा संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर अंकलगी,शीलाकाकी झपके, विश्वेश झपके,प्रसाद झपके, संस्था सदस्या मंगलताई कोरी, राजश्री झपके,झपके कुटुंबीय,प्राचार्य चारुदत्त जगताप, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापिका शुभांगी पवार, इंग्लिश मेडियम मुख्याध्यापिका शिल्पा ढाळे, पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका रोहिणी व्हटे,पुजा समिती उन्मेश आटपाडीकर,निलेश जंगम,उत्सव विभाग प्रमुख नरेंद्र होनराव,प्रा.धनाजी चव्हाण, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.पूजेनंतर वाजत-गाजत गणपतीची भव्य मिरवणूक शाळेकडे मार्गस्थ झाली. विद्यालयात पोहोचल्यानंतर प्राचार्य चारूदत्त जगताप यांच्या हस्ते पूजा करून ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठापनेवेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले टिपरी नृत्य, लेझीम आणि मूकनाट्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आरतीनंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, दरवर्षीप्रमाणे यंदाचीही श्री गणेश मूर्ती नरेंद्र होनराव सर यांच्याकडून देण्यात आली. या सोहळ्यासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे, मकरंद अंकलगी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी गणेशोत्सव समिती, सांस्कृतिक विभाग आणि उत्सव विभाग व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले.चौकट – सांगोला विद्यामंदिरची गणेशोत्सव मिरवणूक संपूर्ण शहराचे आकर्षण ठरली. विद्यामंदिर – वाढेगाव नाका – झपकेवाडा – देशपांडे नाकील चौक – कोष्टी गल्ली – मणेरी चौक – मारुती मंदिर – जय भवानी चौक – तहसील कार्यालय आणि पुन्हा विद्यामंदिर असा या मिरवणुकीचा मार्ग होता. यात प्रशाला व कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, एनसीसी विद्यार्थी आणि स्काऊट गाईडच्या पथकांनी हिरिरीने सहभाग घेतला. गणपती बाप्पाच्या घोषणांच्या निनादात मार्गस्थ झालेली मिरवणूक आणि ठिकठिकाणी सादर झालेल्या लेझीम, टिपरी नृत्य व मूकनाट्याच्या बहारदार प्रात्यक्षिकांनी उपस्थित शहरवासीयांना मंत्रमुग्ध केले. Post navigation महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ नियोजन खात्याकडे वर्ग, लिंगायत समाजात आनंद.. अभिनेत्री व नुत्यांगणा शिल्पा शाहीर नागपुरकर यांचा २० वर्षा चा संघर्ष