सांगोला प्रतिनिधी
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून, वाहतुकीला अडथळा निर्माण न करता, डीजे चा वापर न करता पारंपारिक वाद्याने मोठ्या भक्ती भावाने उत्सव साजरा करा तसेच लेझरचा वापर टाळावा व ध्वनी मर्यादेचे पालन करावे असे नाझरे आऊट पोस्टचे सपोनी सिकंदर वर्धन यांनी नाझरे ता. सांगोला येथे शांतता कमिटीच्या बैठकीत मत व्यक्त केले.


सदर बैठकीत शांतता व दक्षता समितीच्या सदस्यासह, गणेश मंडळाच्या पदाधिकारी विविध सूचना मांडल्या तसेच ही बैठक आगमनासाठी आहे नंतर आपण विसर्जनासाठी ही बैठक घेणार आहे असेही सपोनी वर्धन यांनी सांगितले. सदर प्रसंगी पोलीस हवालदार
एस.सी. माने, सुजित जाधव, एस सी भानवसे, सर्व पोलीस पाटील, पत्रकार रविराज शेटे, गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, गणेश भक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *