मायणी प्रतिनिधी–आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांना स्वातंत्र्याची जाणीव होती म्हणून त्यांनी परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष केला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेचत्यांनी आपल्या सहकाऱ्यांना संघटित करून इंग्रजांच्या विरोधात संघर्ष उभारला. सामान्य लोकांना मोठा दिलासा देणारे उमाजी नाईक यांच्या शौर्याची परंपरा आजही जिवंत असून त्यांची २३५ वी जयंती मायणी ता.खटाव येथे ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३५ व्या जयंती निमित्त सायंकाळी ७ वाजता आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची प्रतिमा फुलांनी सजविलेल्या रथामध्ये बसविण्यात आली होती. समाजातील तरुणांनी जेजुरी येथून पायी आणलेली ज्योत घेऊन आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांचा विजय असो,येळकोट येळकोट जय मल्हार,सदानंदाचा येळकोट घे अशा जयघोषात हजारो समाज बांधव- भगिनी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भंडाऱ्याची उधळण करीत मिरवणुकीस सुरुवात झाली.राजे उमाजी नाईक यांच्या रथासमोर बंगाळ्या, ब्रह्मनाथ ढोल ताशा नृत्य यांनी आपापल्या संगीताचे सादरीकरण केले. हा रथ विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून उभी पेठ,चावडी चौक,बसस्थानक,मुख्य बाजार पेठेतून,मराठी शाळा परिसर मार्गे चांदणी चौकात मिरवणुकीचा शेवट करण्यात आला.चांदणी चौक येथे राजे उमाजी नाईकांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दिवसभर अनेक मान्यवरांनी,ग्रामस्थांनी,भाविक भक्तांनी दर्शन घेतले.‘ब्रम्हनाद’ ढोल ताश्या उपस्थितांची मने जिंकली.जयंती व मिरवणुकीचे सर्व नियोजन आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांची शासकीय जयंती असल्यामुळे मायणी ग्रामपंचायतीसह,सर्व शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मायणी पोलीस दूरक्षेत्राताचे पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्थ ठेवण्यात आला होता. मायणी : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले समाज बांधव व ग्रामस्थ. Post navigation शिक्षकांचा मेढ्यात गौरव पण जावळीत प्राथमिक शाळेकडे लक्ष देण्याची मागणी डीजेचा वापर न करता पारंपारिक वाद्याने गणेशोत्सव साजरा करा..- सपोनी सिकंदर वर्धन