प्रतिनिधी – सांगोला बळीराजाला आपल्या शेतातील माल थेट बाजारपेठेपर्यंत सहज पोहोचवता यावा, यासाठी राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सांगोला तालुक्यात प्रशासकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. या योजनेच्या सांगोला विधानसभा क्षेत्रीय समितीच्या सह-अध्यक्षपदी ॲड. सचिन लक्ष्मण देशमुख यांची निवड झाली असून, त्यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आणि तालुक्यातील शेत रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.तालुक्यात या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात 103 गावांमध्ये एकूण 1,577 शेत रस्त्यांची नोंद करण्यात आली आहे.रस्त्यांचे सद्यस्थितीतील नियोजन व आकडेवारी:नकाशावर नोंद असलेले रस्ते (प्रपत्र-1): एकूण 653 रस्ते.अतिक्रमणमुक्त रस्ते: 634 रस्ते (उर्वरित रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू).पूर्वी झालेली कामे: 339 रस्त्यांवर विविध शासकीय विभागांमार्फत (सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद आदी) कामे पूर्ण.सीमांकन व मोजणी: 295 रस्त्यांचे सीमांकन सुरू असून, यातील 114 रस्त्यांची मोजणी पूर्ण होऊन सांकेतांक प्राप्त झाला आहे; तर 181 रस्त्यांची मोजणी प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.नकाशावर नोंद नसलेले पारंपरिक रस्ते: एकूण 920 रस्ते.अतिक्रमणमुक्त रस्ते: 890 रस्ते (30 रस्त्यांवर अतिक्रमण नोंदवले गेले आहे). या रस्त्यांचेही सीमांकन करून नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.निधी व निविदा प्रक्रिया:सुमारे 25 किलोमीटरच्या समूहामध्ये (क्लस्टर) रस्त्यांचे प्रस्ताव तयार करून निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात एकतपूर गटातील शिवणे व अचकदाणी येथील शेत रस्त्यांचा समूह तयार करून निविदा प्रक्रियेसाठी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.ॲड. देशमुख यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आपल्या शेत रस्त्यांबाबतच्या अडचणी व नोंदी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले आहे. _________________________ माझ्यावर विश्वास दाखवून ही मोठी जबाबदारी सोपवल्याबद्दल मी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, महसूलमंत्री, ग्रामविकास मंत्री व पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानतो. शेत रस्त्यांचा प्रश्न फक्त रस्ता बांधण्यापुरता मर्यादित नसून तो बळीराजाच्या आर्थिक प्रगतीशी जोडलेला आहे. प्रांत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून पुढील आठवड्यात बैठक घेऊन प्रलंबित कामांना गती दिली जाईल.ॲड. सचिन लक्ष्मण देशमुख (सह-अध्यक्ष, क्षेत्रीय समिती) Post navigation शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय खो-खो (पुरुष) स्पर्धा म्हसवड येथे उत्साहात संपन्न विकास महामार्गाचा, फटका स्थानिकांना: फलटण तालुक्यातील नागरिकांसाठी ‘विशेष एकत्रित टोल पास’ देण्याची ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी