शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय खो-खो (पुरुष) स्पर्धा म्हसवड येथे उत्साहात संपन्न म्हसवड (विशेष प्रतिनिधी): येथील श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय खो-खो (पुरुष) स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण आणि क्रीडामय वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व सत्कार समारंभास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. संदीप पोमण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालयीन विकास समितीचे उपाध्यक्ष मा.ऍड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने हे होते. तसेच या प्रसंगी सातारा विभागीय क्रीडा परिषदेचे सचिव मा.प्रा.डॉ. शिवराज गायकवाड आणि श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचे प्राचार्य मा.प्रो.डॉ. विकास काकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय विविध महाविद्यालयांचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक आणि राष्ट्रीय खो-खो पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांच्या संघांनी उत्तम क्रीडाकौशल्य व चुरस दाखवली. या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे राहिला: प्रथम क्रमांक: सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय, कराड द्वितीय क्रमांक: वेणूताई चव्हाण महाविद्यालय, कराड तृतीय क्रमांक: श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड चतुर्थ क्रमांक: यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड विजयी व सहभागी सर्व संघांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य मा.ऍड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम आणि प्राचार्य प्रो.डॉ. विकास काकडे यांनी हार्दिक अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास काकडे यांच्या प्रेरणेतून तसेच शारीरिक शिक्षण संचालक डॉ. स्वप्नील पाटील, श्री. बापू कोळेकर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि सहकार्यामुळे या स्पर्धा शिस्तबद्ध व शांततेच्या वातावरणात पार पडल्या. Post navigation ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम सांगोला तालुक्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेच्या कामाला वेग; 103 गावांमध्ये 1,577 रस्त्यांची नोंद