दहिवडी प्रतिनिधी (प्रतिनिधी):
ग्रामीण भागामध्ये तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणाऱ्या आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आशा स्वयंसेविकांना उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण मिळावे म्हणून रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन क्रिटी केअर हॉस्पिटल, वडूज आणि इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सनकोटचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.ग्रामीण भागात ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन गरोदर माता, लहान मुले आणि वृद्ध रुग्णांची काळजी घेतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत दुपारच्या वेळी क्षेत्रिय काम करताना त्यांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागतो. हीच गरज ओळखून आशा स्वयंसेविकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वडूज येथील वडूज क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला दोन्ही संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक आरोग्य अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.यावेळी बोलताना संयोजकांनी सांगितले की, “आशा स्वयंसेविका या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा मुख्य कणा आहेत. समाजासाठी त्या देत असलेल्या योगदानाचा आदर राखत, त्यांच्या आरोग्याची सुरक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे. असे मत डॉ काटकर यांनी व्यक्त केले तर विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती आणि सहकार्य कार्यक्रमास लाभले असून सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. मारुती काटकर, सुधीर शहा, वैभव शहा, कोरेगावचे डॉ. गोसावी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाबूराव गायकवाड, जगदाळे सर, सौ. वैशाली शहा यांच्या हस्ते आशाताईंना सन कोट प्रदान करण्यात आले.हा या उपक्रमास मा. अनुराधाताई देशमुख, मा. नितीन वाघमोडे साहेब, मा. छलानी तसेच इंडियन असोसिएशन ऑफ पुणेचे चेअरमन डॉ. रुणवाल, डॉ. महाजन आणि डॉ. झालटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
आशा स्वयंसेविका यांचा कामप्रती असलेल्या निष्ठेचा भावनेतून इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांच्या सहकार्याने रामकृष्ण मेडिकल फाउंडेशनने या उपक्रमाचे पाऊल उचलले आहे.”सनकोट मिळाल्याबद्दल उपस्थित आशा स्वयंसेविकांनी आनंद व्यक्त केला असून, यामुळे क्षेत्रिय काम करताना उन्हापासून मोठे संरक्षण मिळेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीरशहा यांनी करून आणि पोलिस अधिकारी बाबुराव गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.

आशा स्वयंसेविका मानधनाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देतात. उन्हातान्हात काम करताना त्यांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, या सामाजिक भावनेतून आम्ही हे सनकोट वाटप केले आहे.”

डॉ मारुती काटकर

चेअरमन रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन
……..

उन्हाळ्यात गावात फिरताना खूप त्रास व्हायचा. या सनकोटमुळे आता उन्हापासून आमचे रक्षण होईल आणि काम करणे अधिक सोपे होईल. या मदतीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.”
सुधीर शहा
क्रिटी केअर हॉस्पिटल वडूज

उन्हाळ्यात गावात फिरताना खूप त्रास व्हायचा. या सनकोटमुळे आता उन्हापासून आमचे रक्षण होईल आणि काम करणे अधिक सोपे होईल. या मदतीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.”

सौ सुमित्रा गोडसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *