(अजित जगताप) तापोळा दि: कोयना धरणाने विस्थापित झालेल्या जावळी खोऱ्यातील दरेतांब गावचे सुपुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा सात समुद्रापलीकडे लंडन येथे सत्कार सोहळा झाला. या भूमिपुत्राच्या कौतुक सोहळ्याने महाबळेश्वर- जावळीकरांची छाती अभिमानाने फुलली आहे. लंडनच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करून त्यांनी समतेचाही नारा दिला आहे. अशा शब्दात जावळीचे सुपुत्र व शिवसेना सह संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.जगभरातील नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेला गौरवशाली शब्द म्हणजेजय महाराष्ट्रचा निनाद घुमला. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने वाटचाल करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना‘कॉमनवेल्थपब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ याप्रतिष्ठेच्या पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांनाया पुरस्काराने सन्मानित करण्यात आला याच वेळी मराठी पाऊल पडते पुढे.. याचाही अनुभव जगभरातील अभ्यासू लोकांनी घेतला. या ऐतिहासिकसभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्काराला उत्तर देताना‘नमस्कार- जयमहाराष्ट्र’ असा मराठीतून श्री गणेशा करून मराठी अस्मिता जपली आहे. इंग्रजांच्या भूमीत जाऊन मराठीचा उल्लेख करणाऱ्या या नेत्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा असल्याचे चित्र दिसत होते. आपल्या ओजस्वी भाषणामध्ये महाराष्ट्राने केलेल्या प्रगती सोबतच सामाजिक समतेचा आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्याचाही इतिहास त्यांनी मांडला. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला आपल्या कुटुंबातील व्यक्तींची सोबत आणि साथ मिळाल्यानंतर इतिहास घडतो. आई – पत्नीच्याकाबाडकष्टांतून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची माझी विचारसरणी घडली असे त्यांनी सांगून आपल्या मायभूमीचाही उल्लेख केला. तेव्हा संपूर्ण लंडनचेसभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.मुंबई आणि लंडन ही दोन्ही महत्त्वाची वित्तीय केंद्रे असून फिनटेक, ग्रीनएनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र- ब्रिटनहाऊस ऑफ लॉर्डसमध्ये ३सहकार्याला मोठी संधी असल्याचे त्यांनीआपल्या भाषणात सांगितले.यूके एशियन बिझनेस कौन्सिलआणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्हआर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने हाऊस ऑफ लॉर्डस येथे हा पार पडलेल्याया सोहळ्यात उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर ऑनरेबल बॅरोनेस आर्लेनफॉस्टर आणि यूके एशियन बिझनेसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकौन्सिलचे चेअरमन अँड्रयू ग्रोकॉक,कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळेत्याचप्रमाणे संसदेच्या सभागृहांचे सदस्य,ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीमुख्यमंत्रीपदी असताना आणि आताउपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्यानागरिक – केंद्री, पारदर्शक आणिनाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी हा पुरस्कार मिळाल्याची भावना व्यक्त केली. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी व जिद्द असल्यामुळे भविष्यात खूप काही आणखीन नवीन क्रांती करायची आहे. असे त्यांनी सांगितले. जगभरातून त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सन्मानाबद्दल सातारा जिल्हा शिवसेना गटनेते व पालकमंत्री शंभूराज देसाई, संपर्कप्रमुख शरद कणसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नवी मुंबईचे नगरसेवक सौरभ शिंदे, शिवसेना नेते ऋषिकांत शिंदे ,शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषद सदस्य कविता ओंबळे, यांच्यासह मंत्रिमंडळातील महायुतीच्या सर्वांनीच अभिनंदन केले आहे. सातारा जिल्ह्याच्या वतीने लवकरच भव्य नागरी सत्कार घेण्यात येईल. अशी माहिती निष्ठावंत शिवसैनिकांनी दिली आहे. ……………………………….. लंडनच्या भूमीत सत्कार स्वीकारताना राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे… (फोटो सौजन्य- निनाद जगताप) Post navigation गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संस्कृती लोंढे व सारंगी वाघमोडे प्रथम ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम