सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त,कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४५ व्या स्मृती समारोहानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेची विद्यार्थिनी संस्कृती संतोष लोंढे हिने ८ वी ते १० वी गटामध्ये व सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला विद्यार्थिंनी सारंगी वसंत वाघमोडे हिने इ.११ वी १२ वी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तसेच इ.८ वी ते १० वी गटामध्ये श्रवण शरद अरसूळ, सुलाखे हायस्कूल बार्शी द्वितीय क्रमांक, संस्कृती संजय सरगर कोळा विद्यामंदिर कोळा तृतीय क्रमांक,कावेरी तुकाराम जाधव श्री.सद्गुरू बागडे महाराज विद्यालय बावची तालुका मंगळवेढा चौथा क्रमांक,स्नेहल विलास जानकर उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सांगोला पाचवा क्रमांक तर अकरावी बारावी गटामध्ये वैष्णवी दत्तात्रय चांगभले सी.बी.खेडगीज कॉलेज अक्कलकोट द्वितीय क्रमांक, मृण्मयी तात्या शिंदे कै.शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर ता.मोहोळ तृतीय क्रमांक, प्रियांका सिद्धाप्पा सोरडे कोळा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज कोळा चौथा क्रमांक,सानिका दादासो कोळेकर कोळा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज कोळा पाचवा क्रमांक यश संपादन केले‌.हा निकाल परीक्षक दीपक इरकल,विक्रम बिस्किटे यांनी जाहीर केला. या यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभामध्ये रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व‌ झपके कुटुंबीयांकडून कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन पालक, मार्गदर्शक शिक्षकांसह सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे व स्पर्धेचे उद्घाटक व परीक्षक विक्रम बिस्किटे,प्रा.तुकाराम मस्के,प्रा.डॉ.विजय शिंदे, दीपक इरकल, सचिन लादे,सुधीर इनामदार, पतंगराव बाबर,सुभाष भंडगे,बापुसो भंडगे, पल्लवी मेणकर,मनिषा क्षीरसागर,प्रा.प्रसाद लोखंडे, प्राचार्य चारूदत्त, प्राचार्य अमोल गायकवाड उपस्थित होते.
या स्पर्धेच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्रमुख पाहुणे परीक्षक विक्रम बिस्किटे व परीक्षक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पात्रता फेरी व अंतिम फेरी या स्वरूपात ही स्पर्धा संपन्न झाली.सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रासह प्रोत्साहनपर एकतर्फी प्रवास भत्ता देण्यात आला.
या स्पर्धेसाठी संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके, पर्यवेक्षक जगन्नाथ माने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके,विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक काकासाहेब नरुटे,शुभांगी घोंगडे, मकरंद अंकलगी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य चारुदत्त जगताप, यांनी केले परीक्षक सत्कार निवेदन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य शिवशंकर तटाळे केले.
चौकट – वेळेला सर्वाधिक महत्त्व देणारी आणि उत्कृष्ट नियोजनाची परंपरा जपणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने राज्यस्तराकडे वाटचाल करत आहे. इथले जेवण स्पर्धक एक ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करतात, यातच या वास्तूची पवित्रता लक्षात येते. समाजाला ज्या ज्वलंत विषयांची नितांत गरज आहे, असे विषय मांडण्यासाठी या मंचावर एक दिशा दिली जाते, ही प्रचंड समाधानाची बाब आहे. स्पर्धेतील पारदर्शकता हीच या स्पर्धेची यशस्वीता आहे. ही स्पर्धा केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर आम्हाला परीक्षकांनाही मार्गदर्शन करते. उत्तम वक्ते घडवण्याचा हा ज्ञानयज्ञ गुरुवर्य बापूसाहेबांच्या या मंदिरात असाच कायमस्वरूपी तेवत राहावा, हीच सदिच्छा.
प्रा.तुकाराम मस्के परीक्षक, वक्तृत्व स्पर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *