म्हसवडमध्ये भव्य दहीहंडी उत्सव; भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा जल्लोष! म्हसवड, वार्ताहर… ता. माण | दि. 9 सप्टेंबर २०२६ श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त म्हसवड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवाने शहरातील सांस्कृतिक वातावरणात नवचैतन्य निर्माण केले. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या आयोजनातून आणि सौ. सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दहीहंडी उत्सवात विविध गोविंदा पथकांनी सहभाग घेत मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा थरार उपस्थितांसमोर सादर केला. गोविंदांच्या घोषणांनी आणि नागरिकांच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला, दहीहंडीची पारंपरिक संस्कृती आणि तरुणाईचा उत्साह यांचा सुंदर मिलाफ या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.उत्सवाच्या निमित्ताने संगीत, नृत्य आणि विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणाला आधुनिक मनोरंजनाची जोड मिळाल्याने लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून म्हसवडमध्ये भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याची नवी परंपरा निर्माण होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या सोहळ्याला नगराध्यक्ष सौ.पूजा सचिन विरकर, उपनगराध्यक्ष सौ.श्रीदेवी निशांत पिसे, मा. नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विजय धट,माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, मा. नगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, सचिन विरकर, निशांत पिसे, डॉ. प्रमोद गावडे,नगरसेविका स्नेहल युवराज सूर्यवंशी, चैताली शिंदे, सविता वसंत मासाळ, दिपाली धनाजी शिंदे, प्रमिला ढाले, अरुणा महेश गायकवाड, पूनम वीरकर, स्वाती बनगर, माधुरी लोखंडे, म्हसवड नगरपरिषदेचे बांधकाम सभापती अकील काझी, नगरसेवक विजयशेठ बनगर, नगरसेवक युवराज काका सूर्यवंशी, डॉ. सतीश मासाळ, महेश लोखंडे,आकाश पाणसांडे, प्रज्योत कलढोणे, महावीर विरकर, अभिषेक विरकर, महेश गायकवाड, महेश सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसेच म्हसवड शहर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोविंदा पथकांचा उत्साह, नागरिकांचा जल्लोष आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे म्हसवडचा दहीहंडी उत्सव अविस्मरणीय ठरला. या उत्सवाच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्माष्टमीची परंपरा नव्या उत्साहाने साजरी करण्यात आली. Post navigation पेन्शन अदालतीत सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा; ९ महत्त्वाच्या मागण्यांवर लक्ष विकास महामार्गाचा, फटका स्थानिकांना: फलटण तालुक्यातील नागरिकांसाठी ‘विशेष एकत्रित टोल पास’ देण्याची ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी