सातारा.. . प्रतिनिधी…

सातारा, साताऱ्यात स्वतंत्र क्रिकेट स्टेडियम उभारणीसंदर्भात पाठपुरावा करू, असे आश्वासन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या 51 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिले. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष निशांत गवळी होते.
असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सचिव सुरेश महाजनी, ॲड. कमलेश पिसाळ,सुरेश साधले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, रमेश शानभाग, सुधाकर शानभाग, भालचंद्र निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातारला स्वतंत्र क्रिकेट स्टेडियम उभारावे अशी मागणी क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटप्रेमीनी केली आहे, या पाश्वभूमीवर या सभेत चर्चा झाली, त्या अनुषंगाने खा. उदयनराजे भोसले बोलत होते. क्रिकेट स्टेडियमसाठी गोडोली येथे नगर पालिकेच्या मालकीची जागा आहे. तसेच भव्य स्टेडियम उभारणीसाठी आणखी कोठे जागा असेल तर सुचवा, त्यासाठी मी पुढाकार घेईन, असे ते म्हणाले. या संदर्भात सुरेश महाजनी यांनी सोलापूर, कोल्हापूर, कराड येथे क्रिकेट स्टेडियमची उभारणी सुरु आहे. मग सातारा येथेही असे स्टेडियम व्हावे अशी सर्वांची इच्छा असून खा. उदयनराजे आणि ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी यात पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती केली.
या सभेत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, सहकार मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले,यांच्यासह 34 जणांना असोसिएशनचे सदस्यत्व देण्यात आले. सचिव इर्शाद बागवान यांनी स्वागत करून गतसालातील अहवाल सादर केला.अहवाल सालात विविध स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूना खा. उदयनराजे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्राच्या संभाव्य रणजी क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल सिद्धांत दोशी,
पुरुष खुल्या गटात उत्तम फलंदाज जयेश पोळ, गोलंदाज अथर्व पवार, महिला खुल्या गटात फलंदाज समृद्धी बनवणे, गोलंदाज भूमी फाळके, 19 वर्षाखालील गट मुली फलंदाज निशीगंधा नलावडे, गोलंदाज प्रिया सावंत, 15 वर्षाखालील गट फलंदाज तनिष्का मोरे, गोलंदाज आर्या फडतरे, 16 वर्षाखालील गट मुले, फलंदाज प्रथमेश दंडवते, गोलंदाज साईश बारटक्के, 19 वर्षाखालील मुले, फलंदाज आदिनाथ पाटील, गोलंदाज इशांत जोशी यांना सन्मानित करण्यात आले. इशांतची महाराष्ट्र सम्भाव्य संघात निवड झाली. 14 वर्षाखालील मुले, फलंदाज अवनीश गायकवाड, गोलंदाज कौशल पराडकर, याशिवाय साहिल अवताडे यांचा महाराष्ट्र संघाकडून खेळल्याबद्दल सत्कार करण्यात आला. एम. सी. ए. पॅनल पंच सदानंद प्रधान यांनाही गौरवण्यात आले.
खजिनदार राजू जाधव यांनी आभार मानले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सातारा जिल्यातील पहिली महिला क्रिकेट पंच अंकिता आढाव हिचाही या सभेत सत्कार करण्यात आला
सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सभेत बोलताना ऍड. कमलेश पिसाळ, व्यासपीठावर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, डावीकडून सुधीर एकांडे, अमोल मोहिते, निशांत गवळी, रमेश शानभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *