मंत्री भरतशेठ गोगावले, योगेशजी कदम यांचे सह जिल्ह्यातील खासदार, आमदार राहणार उपस्थित


सांगोला/प्रतिनिधी:: सांगोला विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचा (शिंदे गट) ४ सप्टेंबर रोजी रामकृष्ण विला ,सांगोला येथे भव्य मेळावा आयोजित केला आहे.या मेळाव्यास राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन खार भूमी मंत्री भरतशेठ गोगावले, राज्यमंत्री योगेशजी कदम यांची प्रमुख उपस्थिती असून खासदार ज्योतीताई वाघमारे, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, चंद्रहार पाटील, शिवसेना उपनेत्या दिपाली सय्यद इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे मा.आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

सांगोला विधानसभा मतदार संघात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली असून सांगोला नगरपरिषदे मध्ये शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद माने यांचे सह शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद ,पंचायत समिती मध्ये देखील शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे.शाहजीबापूंच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदार संघात शिवसेना पक्षाच्या सर्वच आघाड्यांचे पक्ष संघटन मजबूत होत असून मध्यंतरी बापूंच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. तालुक्यातील पक्षाचे संघटन आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता शिवसेना व युवासेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध पक्षातून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते प्रवेश होणार आहे.या मेळाव्यास राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन खार भूमी मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, गृह (शहरे) महसूल ग्रामीण विकास व पंचायत राज अन्न व नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण , अन्न व औषध प्रशासन विभाग,राज्यमंत्री योगेशजी कदम यांचे सह खासदार ज्योतीताई वाघमारे, खासदार धैर्यशील माने,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माढा लोकसभा संपर्क प्रमुख ,चंद्रहारदादा पाटील, शिवसेना उपनेत्या दिपाली सय्यद या मेळाव्यास उपस्थीत राहून मार्गदर्शन करणार असल्याचे माजी आमदार ॲड शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. तालुक्यातील युवासेना, सोशल मीडिया व सर्व सेलचे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मेळाव्याच्या तयारीला जोमाने लागले असून संपूर्ण सांगोला शहर भगवेमय करण्यात आले आहे.

चौकट
सांगोला तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढत असून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंबई येथे शेकाप सह अन्य पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्यात देखील अनेकांचा प्रवेश होणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख तथा जि. प.सदस्य दादासाहेब लवटे यांनी सांगितले.

…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी