(उदगीर प्रतिनिधी) देशसेवा हीच ईश्वरसेवा मानत भारतीय सैन्य दल आणि वायुदलात तब्बल ३५ वर्षे प्रामाणिक, निष्कलंक आणि कर्तृत्ववान सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले अतनुर (ता. जळकोट) येथील सुपुत्र तथा सैनिक श्री. सुर्यकांत वैजनाथराव पंचगल्ले यांचा पंचगल्ले परिवार, जिव्हाळा ग्रुप व मित्र परिवाराच्या वतीने उदगीर येथे बुधवारी (ता. १) रोजी जल्लोषात आणि संस्मरणीय सोहळ्यात स्वागत व मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.श्री. सुर्यकांत पंचगल्ले यांनी सुरुवातीला भारतीय सैन्य दलात (आर्मी) २२ वर्षे उत्तम सेवा बजावली. यादरम्यान त्यांनी जम्मू, राजस्थान, पंजाब, लडाख, पुंछ यासारख्या देशाच्या अतिसंवेदनशील व आव्हानात्मक भागात सुरक्षेच्या विविध विभागांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर, काही कालावधीने त्यांनी भारतीय वायुदलाच्या डिफेन्स सेक्युरिटी विभागात १३ वर्षे उत्कृष्ठ सेवा दिली. दि. ३१ आँगस्ट २०२६ रोजी ते बिदर येथील तळावरून सेवानिवृत्त झाले.उदगीर येथील आपल्या स्वगृही परतणार असल्याने पंचगल्ले परिवार आणि जिव्हाळा ग्रुपच्या वतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यांचे आगमन झाल्यानंतर उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व पुष्पहाराने त्यांचे स्वागत केले. तसेच परिवारातील महिलांनी रांगोळी काढून औक्षण करत त्यांचे या यशाबद्दल औक्षण केले. चौकट : या स्वागत सोहळ्यात पशुशल्य चिकित्सक डॉ. अनिल भिकाने यांनी आपल्या भाषणात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर देशसेवेचा मिळालेला मान आणि त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.चौकट : श्री. सुर्यकांत पंचगल्ले यांनी आपल्या ३५ वर्षांच्या सेवाकाळातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. देशसेवा करताना आलेले आव्हानात्मक प्रसंग, लष्करी शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम यावर त्यांनी प्रकाश टाकला. विशेष म्हणजे, आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता त्यांनी अत्यंत आदर्श व संयमी जीवन जगले आहे. युवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “देशसेवा करा, शिस्तप्रिय बना आणि व्यसनांपासून दूर राहा. सेवानिवृत्तीनंतर उरलेले आयुष्य गावातील तरुणांना देशसेवा, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व एकोपा निर्माण करण्यासाठी समर्पित करेन.” चौकट : प्रा. विजया बेलकेरी यांनी कुटुंबात राहुन देशसेवा करत असताना येणा-या अडचणी व जबाबदा-याची सांगड कशी घालावी लागते यावर आपले विचार मांडले. या देशभक्त सैनिकाच्या गौरव सोहळ्याने उपस्थितांच्या मनात राष्ट्रप्रेमाची नवी भावना जागृत झाली. श्री. सुर्यकांत पंचगल्ले यांची देशसेवा, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा ही नव्या पिढीसाठी कायम प्रेरणादायी ठरणारी आहे, अशी भावना यावेळी सर्वच स्तरातून व्यक्त करण्यात आली.जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष श्री विश्वनाथ बिरादार माळेवाडी कर यांचे प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर अनिल भीकाने साहेब (समन्वयक जिव्हाळा ग्रुप) स्वागत गीत देशभक्तीपर श्री विठ्ठल फुलसे मामा श्री देवदासजी नादरगे (माजी अध्यक्ष जिव्हाळा ग्रुपचे, माजी अध्यक्ष श्री दशरथ शिंदे तथा जिव्हाळा ग्रुपचे सदस्य श्री सचिन बापूरे श्री हावगी आचारे सूत्रसंचालन श्री रमकांत बनशेलकीकर ऑनलाइन शुभेच्छा देणारे ग्रुपचे सदस्य श्री अशोक हले श्री बाबुराव वाघमारे श्री वैजनाथ पंचगले, शिवराज पंचगल्ले,बाबुराव पंचगल्ले,बंधु प्रा.डाॅ.सुधीर पंचगल्ले,प्राध्यापिका विजया बेलकेरी,गुरुवर्य प्रा.महादेव गंदीगुडे,सोमनाथ निरने व आप्तेष्ट नातेवाईक व मोठा मिञ परीवार उपस्थीत होता. Post navigation वाढेगांव नगरीला शिव शंभू महादेवाचा आशीर्वाद लाभणार…वैजनाथ काका घोंगडे यांचे कार्य कौतुकास्पद.. सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापूरकर महास्वामीजी.