सांगोला प्रतिनिधीगणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून, वाहतुकीला अडथळा निर्माण न करता व डीजेचा, डॉल्बीचा वापर न करता सांगोला तालुक्यात गणेश उत्सव शांततेत पारंपारिक वाद्याने मोठ्या भक्ती भावाने साजरा करा तसेच लेझरचा वापर टाळावा, ध्वनी मर्यादेचे पालन करावे असेही मंगळवेढा पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी पंचायत समिती मिटींग हॉल सांगोला येथे मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष, पत्रकार, शांतता कमिटीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक यांच्या शांतता समिती बैठकीत सर्वांना आवाहन केले. यावेळी मागील वर्षातील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाचा गौरव करून बक्षीस वितरण करण्यात आले.सदर बैठकीत शांतता व दक्षता समितीच्या सदस्यसह, गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना मांडल्या तसेच गणेश आगमनापूर्वी सांगोला शहरातील रस्त्याची दुरुस्ती करावी व दहा ते बारा दिवसाच्या कालावधीत रात्री ग्रामीण व शहरी भागात विद्युत पुरवठा सुरू ठेवावा, लोड शेडिंग अगर रात्री लाईट घालवू नये या प्रकारचे सूचनाही देण्यात आल्या. तसेच तहसीलदार बाळूताई भागवत यांनीही डीजे चा वापर न करता पारंपारिक वाद्याचा वापर करा व सांगोला तालुक्याचे चांगला तालुका ही ओळख, परंपरा ठेवा व भक्ती भवानी उत्सव साजरा करा असे आवाहन केले. यावेळी नगरपालिका, विद्युत मंडळाचे अधिकारी, गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील उपस्थित होते._____________________________ गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये व कोणत्याही कारणामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये तसेच डीजे चा वापर न करता पारंपारिक वाद्याचा वापर करा व मिरवणुका पारंपारिक मार्गानेच काढाव्यात आणि त्या निर्धारित वेळेत सुरू करून वेळेत समाप्त कराव्यात. दोन मिरवणुका समोरासमोर येऊन वाद निर्माण होणार नाही याची मंडळ आणि विशेष दक्षता घ्यावी, व या काळात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.मा. राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सांगोला. Post navigation लेखनाला असते वैयक्तिक अनुभवाची किनार:योगेश सोमण सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचा ४ सप्टेंबर रोजी भव्य मेळावा