मायणी( प्रतिनिधी-) शाळेबरोबरच अचानक त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरची परिस्थिती पहा. घरच्या परिस्थितीचाही विद्यार्थ्यावर परिणाम होत असतो.असे उद्गार माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी कलेढोण गणात पं.स.सदस्य राजूशेठ जुगदर यांनी आयोजित केलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत बोलताना व्यक्त केले. यावेळी खटाव पं.स.सभापती सौ.वंदना दुबळे,खटाव पं.स.चे सहाय्यक गट विकास अधिकारी जयवंत दळवी,उपसभापती सौ.रेश्मा शेडगे,अंगणवाडी बालविकास प्रकल्पाधिकारी ओंबासे मॅडम,अंगणवाडी सुपरवायझर स्वप्नाली मेढेकर,मायणी पं.स.गण प्रतिनिधी संभाजी कोळी,संतोष दुबळे,कलेढोण ग्राम विकास अधिकारी सोमनाथ सावंत आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कलेढोण गणातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यामध्ये शाळेची प्रगती व अडचणी विषद करण्यात आल्या . डॉ.येळगावकर म्हणाले,मी भाजपाचा आमदार होतो,पण एकाही शिक्षकाविरुद्ध तक्रार केली नाही. कुणाला त्रास दिला नाही.शिक्षकांना इंग्रजी चांगले बोलता आले पाहिजे व शिकवता आले पाहिजे.

प्रत्येक घरातील विद्यार्थ्याच्या पालकांसंबंधी माहिती घ्या. काही पालक व्यसनी असतात,त्यांची नोंद घ्या.चांगल्या शाळेबरोबरच घरची परिस्थिती चांगली पाहिजे,तरच विद्यार्थी चांगला शिकेल.त्यामुळे आत्मियता वाढेल.आपुलकी दाखवा.असे केल्याने शाळेचा पट कमी होणार नाही.विद्यार्थी चांगले घडतील असे सांगून शिक्षकांनी आपल्या समस्या सांगाव्यात,त्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करु असे ते म्हणाले. पं.स.सदस्य प्रसाद उर्फ राजू जुगदर म्हणाले,निवडून आल्यानंतर शाळा सुधारायचे ध्येय मी बाळगले.जास्तीत जास्त मुले मराठी भाषेतून शिकली पाहिजेत,हा माझा प्रयत्न आहे.

प्रत्येक शाळेने आपल्या अडचणी सांगाव्यात त्या दूर केल्या जातील.आपण कुठे कमी पडतोय त्याचे आत्मपरीक्षण करा व मुलांना चांगले शिक्षण द्या. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी जयवंत दळवी, ओम्बासे मॅडम,सोमनाथ सावंत यांनी आपले विचार मांडले व प्रसाद जुगदर यांना धन्यवाद दिले. – पां

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *