म्हसवड वार्ताहर …

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसवड नंबर एकचा विद्यार्थी श्रीराम वास्ते याने शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवला.


एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसवड नं. १ चा विद्यार्थी श्रीराम महेश वास्ते वास्ते याने 242 गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये येऊन शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे. त्याला वर्गशिक्षिका सौ. जाकिरा मुल्ला मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. वडूज तालुका खटाव येथे कार्यरत असणारे बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री महेश वास्ते यांचा तो चिरंजीव आहे. एका शासकीय अधिकाऱ्यांनी आपला मुलगा जिल्हा परिषद शाळेत ठेवून जिल्हा परिषद शिक्षकांविषयी असणारा विश्वास श्रीराम च्या यशाने वृद्धिंगत झाला आहे.
श्रीराम च्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख दीपककुमार पतंगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अमृता मंडले, मुख्याध्यापक राजाराम खाडे, सहकारी शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *