म्हाडाच्या मुख्य अभियंता पदावर निवड.. येळवीत भव्य सत्कार सोहळा संपन्न.. सांगोला प्रतिनिधीशिक्षणाच्या जोरावर म्हाडाच्या मुख्य अभियंता पदावर अनिल अंकलगी यांची निवड होणे म्हणजे त्यांनी येळवी ता. जत सारख्या ग्रामीण भागातून शिक्षणास सुरुवात करून आज म्हाडाच्या मुख्य अभियंता पदापर्यंत मजल मारणे म्हणजे हे सहज व सोपे नाही व याचा मला व येळवीकरांना सार्थ अभिमान आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांची प्रेरणा, विचार घेऊन शिक्षणात करिअर घडवावे व अनिल अंकलगी यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम स्कूल येळवीच्या प्रांगणात येळवी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य सत्कार सोहळ्याप्रसंगी मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी जतचे पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले हे होते.सुरुवातीस सर्वांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील यांनी केले. यावेळी प्राचार्य एम एस पाटील, पारे सरपंच संतोष पाटील, नगराध्यक्ष रवींद्र आरळी, जि प सदस्य संजीव कुमार सावंत, प.स. सदस्य विजय रुपनूर, सोलापूर बार असोसिएशन अध्यक्ष हिराचंद अंकलगी, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी अनिल अंकलगी यांचा गौरव पट सांगितला तसेच आपल्या गावातील सुपुत्राने म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड ही गावाच्या दृष्टीने अभिनंदनीय निवड असल्याने सर्व गाव सत्कारासाठी लुटले होते, व येळवी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या जल्लोषात अनिल अंकलगी व सौ. अस्मिता अंकलगी या दोघां उभयंतांचा भव्य सत्कार केला. सदर प्रसंगी सांगली जिल्हा पशुधन व कृषी सभापती तमन गौडा रवी पाटील येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. अध्यक्ष सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय कांबळे, रासपाचे विक्रम ढोणे, आबा मोटे, सरपंच आरती ताई अंकलगी, राधिका ताई सलगर, हेमंत भोसले, अण्णाराव पाटील, सचिन सलगर, चंद्रकांत घुटुकडे, माजी प्राचार्य चंद्रशेखर अंकलगी, अशोक बन्नेवार, दामाजी संचालक गौडाप्पा बिरादार, मारुती मदने, उद्योजक प्रवीण तोडकर, काकासो तोडकर, शिरीष कुमार शेटे, ज्येष्ठ नेते पंचाक्षरी काका अंकलगी, उपसरपंच विश्वास खिलारे माजी उपसरपंच सुनील अंकलगी, सोसायटी चेअरमन सुनील जगताप, पोलीस पाटील सचिन माने विविध गावचे सरपंच, नेतेमंडळी, महिला, विद्यार्थी, येळवी व परिसरातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष पाटील, सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी तर सर्वांचे आभार ओंकार स्वरूपा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दीपक अण्णा अंकलगी यांनी मानले. गावं हाच माझा परिवार…अनिल अंकलगी यांच्या सत्कार समारंभातून केवळ एका व्यक्तीच्या पदोन्नतीचा गौरव झाला नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर उच्च पदापर्यंत पोहोचू शकतात हा विश्वास नव्या पिढीसमोर निर्माण झाला. ग्रामीण भागात शिकत असताना माझे आई-वडील, भाऊ, स्वर्गीय काका राजाभाऊ अंकलगी, नातेवाईक, मित्रमंडळी व गावातील असंख्य व्यक्तींनी मला प्रोत्साहन दिले व त्यामुळे मी आज म्हाडाच्या मुख्य अभियंता पदी पोहोचलो व या यशामध्ये या सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे व सर्वांच्या ऋणात राहीन. तसेच मुलींना शिकवा कारण कुटुंबाच्या आणि समाजाचे भाग्य उजळते व विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द व सकारात्मक विचार ठेवा म्हणजे ध्येय गाठता येईल व जिथे जिथे अडचण वाटेल तिथे मला केव्हाही फोन करा, प्रत्यक्ष भेटा, सहकार्य करण्याची माजी सदैव तयारी राहील याची ग्वाही देतो.मा. अनिल अंकलगीमुख्य अभियंता म्हाडा Post navigation श्रीराम वास्ते यांचे शिष्य वृती परिक्षेत यश.. खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धाव