म्हसवड… प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा, व टेनिस क्रिकेट असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने, पाचगणी येथे झालेल्या शालेय जिल्हातरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवडच्या खेळाडूंनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
14 वर्षे मुले या वयोगटातील टेनिस क्रिकेटच्या जिल्हास्तरीय स्पर्धा पाचगणी येथे नुकत्याच संपन्न झाल्या.
या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातून निवडक एकूण सात संघ सहभागी झाले होते. क्रांतिवीर शाळेचा कर्णधार मिहीर काटकर यांच्या नेतृत्वाखालील खेळाडूंनी अटीतटीची खेळी करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. या संघाची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा शिक्षक तुकाराम घाडगे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
संस्थापक अध्यक्ष, कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, उपाध्यक्ष ॲड . इंद्रजीत बाबर,संस्था सचिव आदर्श मुख्याध्यपिका सुलोचना बाबर,महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन चे सहसचिव चंद्रकांत तोरणे, शिक्षक पालक यांनी खेळाडूंची अभिनंदन केले.
