बिरदेव शाळेत बाल चमूंच्या आठवडी बाजाराला पालक व ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद


दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे

माण तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात, गुणवत्तेत अग्रेसर असणारी

बिरदेव बालक मंदिर येथे बाल चमूंचा बाजार अगदी गर्दीने फुलून गेला होता

शाळेतील
इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्य्थांनी विविध प्रकारची फळे,भाजीपाला,खाद्यपदार्थ,व शालेय साहित्य यांची दुकाने थाटली होती.

जणू काही आठवडी बाजार भरला
असे चित्र दिसुन येत होते.बाल आनंद मेळाव्यात खरेदीदार म्हणुन गावातील नागरीक,दुकानदार,पालक,महिला शिक्षिका,शिक्षक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रणाणात आपला सहभाग नोंदवित या बाल आनंद मेळाव्यात चिमुकल्या खरेदी करून आनंदित केले
शाळेतील शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बालपणापासूनच खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, आनंदातून व्यवहार ज्ञानाची सांगड घालता यावी, व्यवहारात नफा- तोटा अनुभवता यावा, पैश्याची ओळख व्हावी , प्रत्यक्ष अनुभवातूनच स्वयंरोजगाराची व स्वावलंबनाची जाणीव व कौशल्य प्राप्त व्हावे,शिवाय श्रमाचे महत्त्व कळावे, यातून आर्थिक कमाई कशी होते? हे समजावे, या अनुभवातून भविष्यातील उद्योजक तयार होतील या उद्देशाने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बाळ चमूंचाआठवडी बाजार’ हा उपक्रम राबवला. या आगळ्यावेगळ्या बाजारात शनिवार bसुट्टीचा दिवस असूनही इयत्ता पहिली ते चौथीच्या बाल व्यापाऱ्यांनी सर्व प्रकारची दुकाने नीटनेटक्या पद्धतीने मांडली होती.या बाल व्यापाऱ्यांनी वीस ते पंचवीस हजार रुपयांची उलाढाल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *