कुकडवाड गटात देसाई यांना नामदार गोरे यांचे आव्हान… पहा..

अनिल देसाई च्या गडात गोरेनी थोपटलेले.. दंड. देसाई. करतील का थंड

दहिवडी प्रतिनिधी: जयराम शिंदे

माण तालुक्यात केवळ कुकुडवाड गट खुला असल्याने या ठिकाणी सर्वाधिक चुरस पहावयास मिळणार आहे

कुकुडवाड गट हा सर्वाधिक चुरशीचा आणि लक्षवेधी ठरणार आहे. या गटात सातारा जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देसाई हे मातब्बर आहेत. त्यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते कट्टर गोरे विरोधक म्हणून ओळखले जातात. कुकुडवाड गटात सध्या अनिल देसाई यांनी सर्वांच्या स्वप्नांना घाम फोडला आहे

कुकुडवाड जिल्हापरिषद गट जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाईंचा बालेकिल्ला असून अनेक वेळा जिंकलेला गड आहे त्याला आमदार मंत्री गोरे यांच्या माध्यमातून प्रथमच तगडा उमेदवार देऊन सुरुंग लावण्याचे काम सुरू झाले आहे मात्र अनिल देसाई यांचा हक्काचा असणारा हा गट सध्या त्यांच्या राजकीय भविष्यावर आलेला आहे.अनिल देसाई व अभय दादा जगताप यांच्या माध्यमातून या गटात विकासाचा डोंगर उभा केला आहे

हीच प्रतिमा घेऊन जनतेसमोर जाण्याची संधी किती जिंकण्यात उतरते हा येणारा काळच ठरवणार आहे

अनिल देसाई व अभय दादा जगताप यांनी कामाच्या माध्यमातून

संस्था , संघटना टेंभू योजन पाणी व्यवस्था यांच्यामध्यमातून जोडलेली गावे आहेत मात्र तेवढेच काम मंत्री महोदय गोरे यांनी सुद्धा माजी कृषी सभापती शिवाजी शिंदे आप्पा पुकळे , मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड

व नेहमीच्या कामाच्या शैलीतून

सोनियाताई गोरे यांच्या माध्यमातून नवीन कामाच्या उद्घाटन सपाटा असेल
कोट्यवधीची केलीली कामे असतील मात्र सध्या कुकुडवाड गटात देसाईंच्या आव्हानाला आयता उमेदवार किती चालेल अजून तरी शंका पंचक्रोशीतील गावातून होत आहे अनिल देसाई यांची ताकदीला अभय जगताप यांची जोड मिळाली असून इथे फक्त देसाई पॅटर्न चालत होता त्याला घरघर ही आमदार गोरेनी दिलेल्या उमेदवार सुरवात होईल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. राजकीय गणिते मांडून मोडीत काडून फेल केलेल्या गोरे बंधूंनी कुकुडवाड गटात जिंकण्याचा बांधलेला चंग किती खरा ठरतोय हे त्यानीं विधान सभेत या गटासाठी दिलेला शब्द तर पूर्ण झालेली कामे ठरवू शकतात मंत्री जयकुमार गोरेनी या भागात पाण्याच्या माध्यमातून जिंकलेला जनतेचा विश्वास किती कामी येतोय हे येणाऱ्या मतपेटीत दिसून येईलच शिवाय अनिल देसाई नि वरकुटे मलवडी येथील पाणी योजना , ते वेगवेगळ्या फंडातून खेचून आणलेला निधी ,गटातील प्रत्येक घरापर्यंत जपलेले जिव्हाळ्याचे संबंध यात किती कामी येतात हे येणाऱ्या निवडणुकीत दिसून येणार आहे

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *