गोंदवले सोसायटीवर तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक विकास पॅनेलचा दणदणीत विजय गोंदवले, दि. ३ (प्रतिनिधी):गोंदवले बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळवत विरोधी राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलचा धुव्वा उडवला. या निवडणुकीत दोन्ही पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली होती. रविवारी झालेल्या मतदानात संस्थेच्या एकूण १,२५१ मतदारांपैकी १,११३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित झाला, तर विरोधी शेतकरी विकास पॅनेलला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. निकाल जाहीर होताच विजयी पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात व घोषणाबाजी करत गावातून भव्य विजय मिरवणूक काढली. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण मतदारसंघ: नितीन बाबूराव कट्टे राजेंद्र बाबासो कट्टे राजेंद्र शिवाजी कट्टे, मोहन राजाराम नवले, शरद नारायण पाटील, रेवणनाथ बापूराव फडतरे, विकास रामचंद्र मडके, विलास रामचंद्र लोखंडे. महिला राखीव: छबुताई गुलाब कट्टे, तेजस्विनी सुखदेव कट्टे इतर मागासवर्गीय: सदाशिव महादेव काटकर. अनुसूचित जाती: सिद्धार्थ बापूराव रणपिसे. भटक्या-विमुक्त / विशेष मागास प्रवर्ग: दत्ता हरिभाऊ सुतार. विजयी सदस्यांनी मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध विकासकामे व उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. ..विजयी उमेदवार … Post navigation संरक्षण सेवा हीच खरी देशसेवा असल्याने प्राधान्य द्या- विलास इंदलकर सांगोला तालुक्याला पाणी मिळण्याच्या हालचालींना वेग ; १० ते १२ दिवसांत माण नदीत टेंभूचे पाणी दाखल होणार