नाझरे प्रतिनिधीसांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोळा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी उत्तम चंद्रभान सरगर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे तात्या, पत्रकार रविराज शेटे यांच्या शुभहस्ते उत्तम सरगर सर यांचा प्रशालेत भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन मुख्याध्यापक उत्तम सरगर यांना सर्वांनी सहकार्य करावे व शाळेची प्रगती करावी असे आवाहन सचिव मल्लिकार्जुन घोंगडे यांनी केले. सुरुवातीस गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .सर्व शिक्षक.. शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेचे, संस्थेचे नियम पाळावेत व शैक्षणिक बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, गुणवत्ता पाहिजे असे नूतन प्राचार्य उत्तम सरगर यांनी यावेळी सांगितले. सदर प्रसंगी माजी प्राचार्य श्रीकांत लांडगे यांचाही सत्कार करण्यात आला..यावेळी दादासो वाघमोडे यांनीही उत्तम सरगर सर यांचा सत्कार केला. यावेळी प्रा. डी.के. पाटील, प्रा. गणेश घेरडीकर, प्रा. प्रताप खडतरे, शिक्षक नेते दादासो वाघमोडे, कुंडलिक आलदर, मारुती सरगर, काकासो पांढरे, प्रा. तानाजी सरगर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार पर्यवेक्षक जगन्नाथ माने यांनी मानले. Post navigation पक्ष संघटन मजबूत बनवा मी तुमच्या पाठीशी आहे…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संरक्षण सेवा हीच खरी देशसेवा असल्याने प्राधान्य द्या- विलास इंदलकर