पक्ष संघटन मजबूत बनवा मी तुमच्या पाठीशी आहे……उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


म्हसवड… प्रतिनिधी
समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन शिवसेना शेतकरी पक्ष संघटन मजबूत बनवा मी तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी शेतकरी सेना शिष्टमंडळास दिले.
शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर व शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
शिवसेना पदाधिकारी ची सामाजिक व राजकीय कामे वेगाने होण्यासाठी पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन मुंबई येथे ठराविक दिवसाच्या आंतराने शिवसेनेच्या मंत्री महोदयांची कार्यकर्ता व पदाधिकारी संवाद बैठक नियोजित करावी अशी मागणी प्रा. विश्वंभर बाबर यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. म्हसवड नगरपालिका तसेच माण तालुक्यातील विकास कामाबाबतही प्रा. बाबर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी सेनेच्या माध्यमातून केले जाणारे कार्य व पक्ष संघटन मजबुतीकरण याबाबतही उपस्थित मान्यवरांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना माहिती दिली. यावेळी शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष बीड नाथराव कराड, महेश शेडगे, आदित्य रांजणकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *