(मुरूम प्रतिनिधी)

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गुरुवारी (ता. २३) विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील यांच्या मुरुम येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ​या प्रसंगी आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना तुळजाभवानीची भव्य प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, निलंगाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्त्याचे सहअध्यक्ष शरण पाटील, उदगीरचे माजी आमदार गोविंद केंद्रे, भाजपचे नेते गणेश हाके, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, संपदा शरण पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. या भेटप्रसंगी पाटील परिवाराच्या वतीने त्यांचे आदरतिथ्य करत स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान राजकीय आणि सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. धाराशिव व लातूर जिल्ह्यातील बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथे रविंद्र चव्हाण यांचा पाटील परिवाराच्या वतीने सत्कार करताना बसवराज पाटील, बापूराव पाटील, शरण पाटील व अन्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *