देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस म्हसवड येथे उत्साहात साजराम्हसवड नगर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या पत्नी व भाजपा नेत्या सौ. सोनिया ताई गोरे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.अहिल्यादेवी उदयनलगतच्या जागेत सौ. गोरे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.प्रथमत: प्रमुख पाहुणे सौ. सोनियाताई गोरे यांचे स्वागत जी. प. शाळा म्हसवड नंबर 3 मधील विद्यार्थ्यांनी स्वच्छता व वृक्षारोपण चे बॅनर हातात धरून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.या बालचमुंनी देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सामूहिक गीत गाऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.विद्यार्थ्यांच्या वैशिष्ठयपूर्ण वाढदिवसाच्या शुभेच्छामुळे त्यांचे कौतुक सौ गोरे यांनी केले.यावेळी म्हसवड नगरपरिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सभापती व सर्व नगरसेवक उपस्थित होते.तसेच माजी नगराध्यक्ष श्री नितिन भाई दोशी, भाजपा मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने,असंख्य नागरिक व नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. Post navigation क्रांतिवीर शाळेत सायबर गुन्हेगारी बाबत पोलिसातर्फे कार्यशाळा