म्हसवड…. प्रतिनिधीशालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हेगारी बाबत जनजागृती व्हावी म्हणून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा व म्हसवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधनपर कार्यशाळेचे आयोजन केले होते.सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तसेच वडूज उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे केले होते. ऑनलाइन व्हीसीद्वारे अत्याधुनिक प्रोजेक्टरच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी बाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले.मोबाईल च्या माध्यमातून होणारी वाढती बँकिंग गुन्हेगारी, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षा, डिजिटल व्यवहार सुरक्षितता तसेच व्यक्ती निहाय घ्यावयाची काळजी इत्यादी बाबत या निमित्ताने प्रबोधन करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर मुख्याध्यापक अनिल माने पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी प्रकाश इंदलकर व संतोष काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक सागर बाबर यांनी केले. Post navigation क्रांतिवीर शाळा मुख्यमंत्रीपदी आयुध धावड, उपमुख्यमंत्रीपदी ईश्वरी त्रिगुणे व चेतन राठोड