म्हसवड…. प्रतिनिधीशालेय विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची बीजे रुजवण्याच्या दृष्टीने प्रबोधन व्हावे म्हणून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे वर्गनिहाय निवडणुकीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.शालेय विद्यार्थ्यांना लोकशाही समजली पाहिजे, त्याबाबतचा कालावधी, प्रचार,आचारसंहिता,मतदान पद्धत, मतदानाचा हक्क, निवडणुकीतील एकूणच सर्व प्रक्रिया समजून देण्याच्या निमित्ताने क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे लोकशाही पद्धतीनेवर्ग निहाय बॅलेट पेपरच्या सहाय्याने वर्ग प्रतिनिधी निवडण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांमधून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शालेय मंत्रिमंडळाचा तपशील पुढील प्रमाणे. मुख्यमंत्री आयुध सोमनाथ धावड, उपमुख्यमंत्री ईश्वरी पोपट त्रिगुणे व चेतन संजय राठोड,. पहिली महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान ईश्वरी त्रिगुणे हिने पटकविला. शिक्षण मंत्री राबिया तांबोळी, हर्ष म्हमाने शालेय पोषण आहार मंत्री , विघ्नेश गुरव सहल मंत्री, स्वरा भोसले आरोग्यमंत्री, अनुष्का ढगे सांस्कृतिक कार्यमंत्री, संजीवनी कारंडे स्वच्छता मंत्री , राजवर्धन शिंगाडे क्रीडामंत्री. लोकशाही पद्धतीने मतदानातून निवड झाल्याने आमची जबाबदारी वाढली असल्याची माहिती शालेय मुख्यमंत्री आयुध धावड यांनी आपल्या मनोगता मधून सांगितले.संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर, संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, उपाध्यक्ष ॲडवोकेट इंद्रजीत बाबर यांनी नवनियुक्त शालेय मंत्री मंडळ सदस्यांचा सत्कार केला. तसेच या निमित्ताने क्रीडाशिक्षक तुकाराम घाडगे यांनी शाळेच्या सर्वांगीण हिताची शपथ नवनियुक्त मंत्रिमंडळ सदस्यांना दिली. Post navigation दिल्लीतील आंदोलनाने साताऱ्यात भाजप बद्दलची प्रतिमा खलनायकासारखी. क्रांतिवीर शाळेत सायबर गुन्हेगारी बाबत पोलिसातर्फे कार्यशाळा