(अजित जगताप ) सातारा दि: नवी दिल्ली येथील जंतर मंतर वर होणाऱ्या आंदोलनाबाबत संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्ह्यातील काही पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते व विद्यार्थी हे नवी दिल्ली येथील जंतर मंतर वर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे एकेकाळी भाजपचे समर्थन करणारा साताऱ्यातील विद्यार्थी भविष्याची काळजी करत आहेत. त्यामुळे कळत नकळत भाजपची साताऱ्यातील प्रतिमा खलनायकासारखी झाली आहे. महायुतीमध्येही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे.क्रांतिकारकांचा सातारा जिल्हा हा नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करत आहे. सध्या महायुतीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात खासदार व आमदार सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत. नीट पेपर फुटी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पक्षाचे नवी दिल्लीसह देशभर आंदोलन होत आहे. या आंदोलनामध्ये आता भाजप विरोधी सर्वच गट आक्रमक झाले आहेत.सातारा जिल्हाधिकारी कार्यालय व साताऱ्यातील इतर ग्रामीण भागातही विविध संघटना व राजकीय पक्षांनी भाजप विरोधी आंदोलकांनी आंदोलन करून कॉक्रोज जनता पक्षाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. कधी नव्हे ते साताऱ्यात भाजपची चांगलीच गोची झालेली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून भाजपने मुस्कटदाबी व हुकूमशाही केली होती. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या तीन सदस्यांना फोडून भाजपने सत्ता मिळवली असली तरी भाजपला नैतिकदृष्ट्या घड्याळ चिन्हावर मत देणाऱ्या मतदारांचे समर्थन मिळाले नाही. आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणूक माध्यमातून पुन्हा एकदा भाजपने बँक ताब्यात घेण्यासाठी आपली राजकारणाची फोडाफोडी भाजपमय रणनीती आखली आहे. शेती उत्पन्न बाजार समिती, वडूज या ठिकाणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व विद्यमान आमदार धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता फोडा आणि भाजपशी जोडा ही दमदार सुरुवात केली आहे. असेच लोन सध्या सातारा जिल्ह्यात इतर ठिकाणी पसरवण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणजे सामान्य माणसांसाठी सध्या भाजपमध्ये खलनायक वाटत आहे.देशभरातून नवी दिल्लीत आलेल्या आंदोलकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात ,लोक कल्याण मार्ग या नवी दिल्लीतील सुरक्षित ठिकाणी निवासस्थानाजवळ ठिय्या मांडून बसले आहेत. यापूर्वी देशात असे कधीही घडले नव्हते. आज भाजप विरोधात सर्वच राजकीय पक्षाने राळ उठवली आहे. सातारा जिल्ह्यातही महायुतीतील घटक पक्ष भाजपवर नाराज आहे. आता ही नाराजी उघडपणे व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्याला उदंड प्रतिसाद लाभला होता.विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने देशाच्या जडणघडणीचा पिलर आहे. हाच पिलर नीट पेपर फुटीने कमालीचा नाराज असल्यामुळे भाजपचा डोलारा उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. अशी प्रतिक्रिया उमटत आहे. वाढती महागाई, नव्याने बांधण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या पुलाचा प्रश्न, महामार्गावर येणारे पावसाचे पाणी, रस्त्यावरील खड्डे आणि शासकीय यंत्रणा व पोलीस दल सध्या भाजपने झाले आहे. याचाही सामान्य माणसांना राग येऊ लागलेला आहे. गोदी मीडिया म्हणून नवी दिल्लीतील प्रमुख वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींची हेटाळणी होत आहे. त्या मानाने सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सोशल मीडिया व युट्युब चॅनेलने सामान्य माणसांच्या अशा चांगल्याच पल्लवीत केल्या आहेत. आज सामान्य माणसांच्या आंदोलनाला व्यापक प्रसिद्धी देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असल्याने प्रमुख वृत्तवाहिनी पेक्षाही स्थानिक वृत्त वाहिनी व सोशल मीडियाला अच्छे दिन आल्याचे बोलले जात आहे. फोटो– सातारा जिल्ह्यातील भाजप विरोधी रणनीती बाबत चर्चा करताना… (छाया- अजित जगताप, सातारा) Post navigation मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट सांगोलाच्यावतीने आयोजित चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरास वारकऱ्यांचा रेकॉर्डब्रेक प्रतिसाद