भोजलिंग ट्रेकर्स ग्रुपचा सामाजिक उपक्रम: ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २५ जानेवारीला ‘भव्य रक्तदान शिबिर’ भोजलिंग डोंगर येथे पार पडली नियोजनाची बैठक; रक्तदात्यांना मिळणार हेल्मेट, मिक्सर यांसारख्या आकर्षक भेटवस्तू! झरे/ प्रतिनिधी राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जोपासत, भोजलिंग ट्रेकर्स ग्रुप च्या वतीने ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या नियोजनासाठी आज, ११ जानेवारी रोजी भोजलिंग डोंगरावर ‘आयुष रक्तपेढी’ आणि ट्रेकर्स ग्रुपची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. नियोजनाची जय्यत तयारी आज झालेल्या बैठकीत शिबिराच्या यशस्वीतेसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. दुर्गम भागात ट्रेकिंगच्या माध्यमातून साहसी उपक्रम राबवणारे हे दुर्गप्रेमी आता ‘रक्तदान’ या जीवनदानाच्या मोहिमेतून समाजसेवेचा एक नवा आदर्श घालून देणार आहेत. गरजू रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदात्यांचा होणार गौरव! रक्तदात्यांच्या उत्साहाचे कौतुक करण्यासाठी भोजलिंग ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने विशेष भेटवस्तू जाहीर करण्यात आल्या आहेत. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला खालीलपैकी एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे: सुरक्षिततेसाठी ‘हेल्मेट’ उपयुक्त ‘हॉटपॉट’ मल्टीपर्पज ‘मिक्सर’ *सहभागाचे आवाहन “एक समाज उपयोगी उपक्रम म्हणून आम्ही या रक्तदान शिबिराकडे पाहत आहोत. समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी, तरुणांनी या मोहिमेत सहभागी होऊन गरजूंचे प्राण वाचवण्यासाठी पुढे यावे,” असे आवाहन भोजलिंग ट्रेकर्स ग्रुपच्या बैठकीदरम्यान केले आहे. ठळक माहिती: शिबिराचा दिनांक: रविवार, २५ जानेवारी २०२६ सहकार्य: आयुष्य रक्तपेढी स्थळ: भोजलिंग डोंगर परिसर प्रमुख आकर्षण: हेल्मेट, हॉटपॉट व मिक्सर यांसारख्या भेटवस्तूंची लयलूट! Post navigation म्हसवड परिसरात भीषण अपघात : उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून तरुणाचा मृत्यू दहिवडी कॉलेजमधील वादग्रस्त शिक्षकांविरोधात पत्रकार एकनाथ वाघमोडे यांचे आमरण उपोषण