सातारा वृत्तसेवा ..

फुले एज्युकेशन तर्फे लता बनसोड आणि आकाश भिसे यांचा 58 वा. सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला !!!

पुणे . थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे , गुरुवार दि.9 जुलै 2026 रोजी दु.4 वा. राजयोग प्लाझा ,वडगांव बु.पुणे 68 येथे जेष्ठ समाजसेवक आयु.यशवंता सखाराम मोरे,काटा ,वाशिम यांची दारिका सत्यशोधिका लता विजय बनसोड (विधवा ), इ.३ री पास आणि जेष्ठ समाजसेवक आयु.नारायण देविदास भिसे ,मेंढा ,धाराशिव यांचे दारक सत्यशोधक आकाश उर्फ पिंटू भिसे (प्रथम ) 12 वी पास या अल्पशिक्षितांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने 58 वा सत्यशोधक विवाह सोहळा संस्थेचे वतीने पूर्णपणे मोफत अल्प मान्यवरांसमक्ष संपन्न झाला.

महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने व प्रकाशन समिती,महाराष्ट्र शासनाचे सदस्य व या संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक या सोहळ्याचे विधिकर्ते म्हणून नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी कार्य पाडले. त्यांचे शुभहस्ते यावेळी वधू वर याना संस्थेचे वतीने सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम भेट दिली. तसेच वधू वरांचे भाऊ वहिनी सौ.शामल आकाश भोई आणि युवा सेना उपविभाग अधिकारी वडगाव शेरी विधानसभेचे श्रीकांत खांदवे यांना बहुमोल सहकार्य केले बद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने सन्मान पत्र देण्यात आले. तर याप्रसंगी सामाजिक कार्याबद्दल अनिस व जनसंघर्ष समितीचे जेष्ठ समाजसेवक सौ.सरोज आणि प्रकाश भारद्वाज यांचा एकत्रित शाल पाघरून फुले दाम्पत्य फोटो फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला.

विवाहाचे सुरुवातीला दारिका लता आणि दारक आकाश यांचे राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय हातात घेऊन फुलांच्या पायघड्यावरून आगमन करीत त्यांचे शुभहस्ते प्रथम ग्रंथांचे पूजन नंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच उपस्थितांनी देखील पूजन केले.दारक आकाश यांनी शपथ पत्राचे वाचन करताना दारिका लता ही विधवा असली तरी देखील तिला त्याची कधीही आठवण होऊ न देता प्रथम वधुसारखे तिला कायम सन्मानाची वागणूक देत एकमेकांचे जीवनसाथी राहून निर्भय सत्यशोधक बनण्याचे अभिवचन दिले.

याप्रसंगी रघुनाथ ढोक म्हणाले की विधवा लता हिचा वयाने मोठी असतानादेखील आकाश आणि त्यांचे कुटुंबाने स्वीकार केला त्या बद्दल संस्थेचे वतीने अभिनदन करण्यात आले. हा आदर्श सर्व समाजाने घ्यावा त्यासाठी पालकांनी आणि नातेवाईकांनी अशा विधवा महिलांना घरी ठेवण्यापेक्षा अपत्य असले तरीदेखील त्यांचा पुनर्विवाह घडविण्यास सकारात्मक दृष्टीने पुढे येऊन मदत करणे काळाची गरज आहे. पुढे ढोक असेही म्हणाले की सध्या अनेक वधू वर यांचे विवाह रखडले असल्याचे जाणवत आहे, त्यामुळे वधू वरांनी आपले उर्वरित आयुष्य सुखमय जगण्यासाठी वेळीच विवाह करावेत असा अनमोल सल्ला देत , फुले एज्युकेशन संस्था सत्यशोधक पद्धतीने मोफत विवाह लावण्यासाठी देशभर उपलब्ध आहे असे देखील म्हंटले.

या विवाह सोहळयाचे सूत्रसंचालन बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राचे संस्थापिका सत्यशोधिका आशा ढोक आणि मोलाचे सहकार्य आकाश – क्षितीज ढोक , श्रीकांत खांदवे ,आणि सौ.शामल आकाश भोई यांनी केले तर आभार दारक आकाश भिसे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *