मायणी बसस्थानक समस्यांच्या विळख्यात मायणी (प्रतिनिधी)मल्हारपेठ – पंढरपूर तसेच सांगली बारामती हे महामार्ग जाणाऱ्या मायणी येथील बसस्थानक हे प्रचंड गैरसोयींच्या विळख्यात अडकले आहे. बस स्थानकावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.पावसाळ्यात हे खड्डे पावसाच्या पाण्याने भरलेले असतात.प्रवाशांना बसस्थानकावरून जाणे येणे करणे कठीण होते.तसेच बसचालकाला बस चालवणे कठीण होत आहे. या बसस्थानकावरील मोठी समस्या म्हणजे खाजगी वाहनांनी बसस्थानकावर केलेले पार्किंग. खाजगी वाहनांनी बसस्थानकावर लावलेल्या वाहनांचा बसचालकाना खूप त्रास होत असतो. त्यामुळे अनेक बसचालक बस स्थानकावर आणण्याचे टाळतात. त्याचा परिणाम म्हणून प्रवाशांना पाहिजे ती बस मिळणे कठीण होते. काही वाहक प्रवाशांना चौकात उतरतात.त्यात काही ज्येष्ठ नागरिक असतात. वयोमानामुळे त्यांना चौकातून बसस्थानकावर येणे त्रासाचे होते. यासाठी बसस्थानकावरील खाजगी वाहनांचे पार्किंग बंद होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य महामंडळाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. आणखी एक बाब प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाची आहे ती म्हणजे मायणी बसस्थानकाची अद्ययावत वास्तू उभी राहिली पाहिजे.स्वच्छता असली तर प्रवाशांना समाधान वाटेल. या सर्व बाबींची दखल संबंधितांनी घ्यावी व मायणी बसस्थानक समस्या मुक्त करावे,अशी मागणी प्रवासी करत आहेत. – – फोटो – पावसाच्या पाण्याने भरलेले मायणी बसस्थानकावरील खड्डे) Post navigation माणदेशी सुपुत्र तथा अक्कलकोटचे डीवायएसपी राजेंद्र टाकणे यांचा अनुलोम परिवारातर्फे गौरव राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सातारा जिल्हा परिषदेत गौरव