(अजित जगताप)
मुंबई दि: अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई- पुणे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महामार्गावर खड्डे आणि पावसाचे पाणी साचले. दरड कोसळल्यामुळे मुंबई- पुणे महामार्ग सोमवार दिनांक ६ जुलै रोजी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत कोणताही फलक न लावल्यामुळे अनेक वाहन चालकांनी मिळेल त्या रस्त्याने मार्गक्रमण केले. महामार्गावर अटल सेतूचा टोल भरला. परंतु, मुंबई ते पुणे महामार्ग बंद ठेवल्याचे कारण सांगून सुविधा नाकारली. तरीही वाहन चालकांकडून एम एम आर डी च्या टोल चालकांनी सेवा मुक्त लूट केल्याची तक्रार वाहन चालकांनी केली आहे.

मुंबईहून पुणे येथे जलद मार्गाने जाण्यासाठी अटल सेतूचा मुख्य टोल नाका नवी मुंबईतील गव्हाण गावाजवळ आहे. सर्वात लांब सागरी पूल ओलांडून अनेकांना मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करावा लागला होता. परंतु हा महामार्ग बंद केल्यामुळे वाहन चालकांना विनाकारण टोल भरण्याचा मनस्ताप व आर्थिक पश्चाताप सहन करावा लागलेला आहे.
याबाबत एम. एम. आर. डी. सी .वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत नसल्याचा आरोप काही वाहन चालकांनी केला आहे. आयोध्या मधील श्रीराम मंदिराची देणगीच्या चोरी प्रकार झाला आहे .परंतु, मुंबई- पुणे महामार्ग बंद असूनही टोल वाहन चालकांना २५० रुपये टोल भरण्यास भाग पाडणे. ही सुद्धा लूट आहे. त्याची चौकशी करून सर्व वाहन चालकांना टोलचे पैसे परत करावे. अशी मागणी करण्यात आलेली आहे.

मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोल नाका (मुंबईकडून पुण्याकडे जाताना) तळेगाव टोल नाका (पुण्याकडून मुंबईकडे येताना)टोल दर (कार/जीपसाठी):एका फेरीसाठी कार किंवा चारचाकी वाहनांना सुमारे ३२० रुपये इतका टोल वाहन चालकांनी भरला आहे. परंतु त्यांना पुढे पुणे येथे जाता आले नाही. महामार्गावरच अडकून पडावे लागले.
अटल सेतूचा मुख्य टोल नाका नवी मुंबईतील ‘गव्हाण’ गावाजवळ आहे.हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल असून, महाराष्ट्र शासनाने २०२६ च्या अखेरपर्यंत या पुलावरील ५० टक्के टोल सवलत कायम ठेवली आहे. तसेच, इलेक्ट्रिक वाहनांना कार आणि बसेस) टोलमधून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.इतर वाहनांसाठीचे सध्याचे अद्ययावत टोल दर कार / चारचाकी वाहने एकेरी प्रवास २५० रुपये दोन्ही बाजूंचा प्रवास : ३७५ रुपये दैनिक पास ६२५ रुपये मासिक पास १२,५०० रुपये मिनीबस / हलकी व्यावसायिक वाहने एकेरी प्रवास ४०० रुपये दोन्ही बाजूंचा प्रवास : ६०० रुपये ,बस आणि २-ॲक्सेल ट्रक एकेरी प्रवास ८३० रुपये दोन्ही बाजूंचा प्रवास १,२४५ रुपये आहे .
सर्वसाधारण गाडीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा एकेरी टोल ३२० आहे, जो उर्स (२४०) आणि खालापूर ८० रुपये असा एम. एस. आर. डी. सी. कडून टोल नाक्यावर टोल आकारला जातो. जर तुम्ही अटल सेतू सागरी पुलावरून नवी मुंबई किंवा विमानतळाकडे पुढे प्रवास करत असाल, तर त्यात सुमारे २५० रुपये अधिक लागतात.
आज सोमवार ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती आणि जुना महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती . घाट रस्ता आणि नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंकवर दरडी कोसळल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना तूर्तास प्रवास न करण्याचे आणि दोन्ही महामार्ग बंद असल्याचे जाहीर केले होते. तरीसुद्धा टोल वसुली नित्यनेमाने केली गेली आहे. तिन्ही पर्याय रस्ते बंद असूनही टोल लूट केल्यामुळे शेकडो वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
मुंबई- पुणे महामार्गावर दररोज दहा ते बारा हजार छोट्या मोठ्या वाहनांची टोल नाक्यावर प्रवासाने संपर्क येतो. या कालावधीत किमान विना सेवा देऊन १५ ते २० लाख रुपये वसूल केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा एक प्रकारे आयोजनातील श्रीराम मंदिरा सारखाच आर्थिक गैरव्यवहार आहे. याबाबत आता एम.एस.आर.डी.सी यांना दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष राज्यपाल यांनीच आता टोल माघार देण्याचा आदेश द्यावा. अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे, जमीर भोसले व वाहन चालक संघटनेने केली आहे.


फोटो- मुंबई – पुणे महामार्गावरील अटल सेतू टोल प्लाझा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *